मुंबई : टाटा समूहातील कंपन्यांच्या शेअर्सनी आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना जोरदार कमाई करून दिली आहे. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये टाटा ग्रुपचे शेअर्स चांगलेच प्रसिद्ध आहेत. टाटा समूहाच्या शेअर्सपैकी एक म्हणजे टाटा समूहाची दिग्गज कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) आहे. टाटा ग्रुपच्या या आयटी कंपनीचा शेअर सध्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकावरून सुमारे १२% घसरणीसह व्यवहार करत आहे. तसेच आपण टीसीएस स्टॉकच्या कामगिरीवर नजर टाकली तर, या वर्षी आतापर्यंत तो जवळजवळ सपाट राहिला आहे.गुंतवणुकीची चांगली संधी! दमदार परताव्यासाठी दिग्गज ब्रोकरेजचा ‘हा’ स्टॉक खरेदीचा सल्ला
टीसीएस शेअरची किंमत
टाटा समूहाच्या प्रमुख आयटी कंपनीचे शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांक ३८३५.६० रुपयांवरून ३१११ रुपयांवर घसरले आहेत. असून मंगळवारी सलग ९व्या सत्रातही स्टॉकमध्ये घट झाली, मात्र आज दुपारी ०.३७% वाढीसह ३,११७.६५ अंकांवर व्यवहार करत आहे. बुधवारी एनएसईवर रु. ३,१११ रुपये प्रति शेअरवर क्लोज झालेला आयटी स्टॉक २,९२६.१० रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवरून किंचित वाढीसह ट्रेड करत होता. तरीही ५ एप्रिल २०२२ रोजी ३,८३५.६० रुपयांच्या एका वर्षातील उच्चांकावरून स्टॉक जवळपास १९% खाली आपटला आहे.

शेअर बाजारात मोठे चढउतार, आता मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
TCS स्टॉक खरेदी-विक्री की ‘होल्ड’ करावा?
बाजार विश्लेषकांनी मोठ्या प्रमाणात ‘मंदी’ आणि नजीकच्या भविष्यात आणखी घसरणीचा अंदाज वर्तवला आहे. आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्सचे वरिष्ठ व्यवस्थापक तांत्रिक संशोधन विश्लेषक गणेश डोंगरे म्हणाले की, “आम्ही या समभागात २,९०० रुपयाच्या पातळीवर विक्री होताना पाहू शकतो. त्यामुळे गुंतवणूकदारांनी या स्तरावर लॉन्ग पोझिशन घेणे टाळावे आणि प्रतीक्षा करावी. पुढील समर्थन पातळी २,८००-२,९०० रुपये आहे. शेअर बाजारातून जोरदार कमाई करायची असेल तर तुम्ही धीर धरणे खूप महत्त्वाचे आहे.

गुंतवणूक करताय… हे लक्षात घ्या!

दरम्यान, ट्रेंडलाइन डेटानुसार स्टॉकची सरासरी लक्ष्य किंमत ३,६९३.८७ रुपये आहे, जी १८.९२ टक्क्यांची संभाव्य वाढ दर्शवते. याशिवाय अलीकडील यूएस-युरोपमधील बँकिंग क्षेत्रातील संकटाच्या पार्श्वभूमीवर विश्लेषकांनी आयटी शेअर्सवर गुंतवणूकदारांना सावधींचा इशारा दिला आहे. तर कंपनीच्या नेतृत्वात अचानक झालेल्या बदलामुळे देखील गुंतवणूकदारांच्या भावनेवर परिणाम होताना दिसत आहे. टीसीएसचे CEO राजेश गोपीनाथन यांनी राजीनामा दिल्यावर कंपनीने के. क्रितिवासन यांना सीईओ म्हणून नियुक्त केले आणि पुढील आर्थिक वर्षांपासून ते मुख्य कार्यकारी व व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार सांभाळतील.

(नोट : वरील तपशील केवळ स्टॉकच्या कामगिरीबद्दल आहे, त्याला गुंतवणुकीचा सल्ला मानू नये. शेअर बाजारात गुंतवणूक म्हणजे जोखमीच्या अधीन असल्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या सल्लागाराचा सल्ला घ्या.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here