आशिष यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले होते. त्यामध्ये त्यांच्या पोटावर आणि पाठीवर काही वळ असल्याचे आढळून आले होते. त्यावरून पोलिसांना त्यांचा अपघात आहे की घातपात याबाबत संशय निर्माण झाला होता.
आशिष कौशिक यांच्या मृत्यूचे गूढ वाढलेले असले तरी कौशिक यांनी आपल्या पत्नीवर व मुलावर चाकूने हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे. आठडाभरापूर्वी अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अश्विननगर येथील शिव बंगल्यात कौशिक कुटुंबात वाद झाला. या वादात आशिष कौशिक यांनी त्यांची पत्नी व मुलगा यांना मारहाण केली. यानंतर अतितणावामुळे कौशिक यांना शारीरिक त्रास होण्यास सुरुवात झाली. त्यांच्या मित्राने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. तेव्हा उपचारादरम्यान आशिष कौशिक यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अंबड पोलिसांत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी वेळीच दखल घ्यायला हवी होती; लेकीच्या न्यायासाठी आई-बापाची आरोपींना फाशी देण्याची मागणी
प्रसिद्ध उद्योजक आशिष कौशिक यांच्या मृत्यूबाबत घातपाताची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. कौशिक यांच्या शरीरावर काही जखमा व वळ असल्याचे आढळून आल्याने अहवाल पोलिसांना देण्यात आला आहे. मात्र, अंबड पोलिसांनी अद्याप अहवाल प्राप्त झाला नसल्याची माहिती दिली आहे. फॉरेन्सिककडूनही अंबड पोलिसांनी अहवाल मागवला आहे.