सिंधुदुर्ग : मोठ्या भावाने धाकट्या भावाची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार कोकणातून समोर आला आहे. आई बाबा धाकट्या मुलाचे अधिक लाड करतात, म्हणून चिडलेल्या मोठ्या भावाने खून केल्याचा आरोप आहे. छोट्या भावाच्या पोटात चाकू खुपसून खून केल्याचं समोर आलं आहे. ही घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कुंभवडे गावातील चिरेखणवाडी येथे रात्री घडली. या घटनेत स्टनी अंतोन डिसोझा (वय ३५ वर्ष, रा. कुंभवडे चिरेखनवाडी) या तरुणाचा मृत्यू झाला. घटनेनंतर कुंभवडे मधील अनेकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. या प्रकरणी आरोपी आयसीन अंतोन डिसोजा (वय ३७ वर्ष, कुंभवडे चिरेखनवाडी) याच्यावर कणकवली पोलिसात कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिममध्ये फोन आला, बोलता-बोलता अचानक कोसळला; पुण्यातील तरुणाच्या मृत्यूचं धक्कादायक कारण
या घटनेने एकच खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मार्टिन अंतोन डिसोजा (वय ६० वर्ष, कुंभवडे चिरेखनवाडी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

लॉंग मार्चमध्ये शेतकऱ्याचा अखेरचा श्वास; कुटुंबियांचे अश्रू अनावर, गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त

घटनेतील मयत व आरोपी हे फिर्यादीचे मुलगे आहेत. आई वडील लहान मुलगा असलेल्या (मयत) स्टनी याचे जास्त लाड करतात, असा मोठ्या भावाचा समज होता. या रागातून आरोपी आयसीन अंतोन डिसोजा याने घरातील चाकू आपला भाऊ स्टनी याच्या पोटात खुपसून त्याला ठार केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर स्टनी हा अक्षरशः रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. या घटनेने सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

ज्या मित्राच्या घरी जेवला, त्याचाच जीव घेतला, मजामस्तीत एक गोष्ट ठरली दोस्तीत कुस्तीचं कारण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here