वरळी सीफेसवर १९ मार्चला झालेल्या अपघातात सीईओचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी चालकाला अटक केली आहे. चालकाच्या मित्रांच्या जबाबातून अनेक महत्त्वाच्या गोष्टी उघडकीस आल्या आहेत.

शनिवारी रात्री मर्चंटनं त्याच्या घरी एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत तो जिन प्यायला. रात्री उशिरापर्यंत पार्टी रंगली होती. त्यामुळे त्याची झोप अपूर्ण राहिली. त्यानंतर सकाळीच त्याच्या कारनं राजलक्ष्मी यांना धडक दिली. मर्चंट ताडदेवचा रहिवासी आहे. त्याला न्यायालयानं १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे.
पार्टी संपल्यानंतर मर्चंट सकाळी त्याच्या दोन मित्रांना घेऊन घरातून निघाला. कारमध्ये एक मित्र आणि मैत्रीण (रिया भाटिया) होती. हे दोघे अनुक्रमे वांद्रे आणि दादर इथे राहतात. या दोघांनी मर्चंटला आराम करण्यास सांगितलं. मात्र मर्चंटनं त्यांचं ऐकलं नाही. त्यानं कार सुरू केली आणि दोघांना घरी सोडण्यासाठी निघाला, अशी माहिती वरळी पोलीस दलातील सुत्रांनी दिली.
समजून घ्या, सायबर फ्रॉड करताना नेमके तुमचे डिटेल्स समोरच्याला कसे मिळतात?
रिया भाटिया यांचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. मर्चंटची झोप पुरेशी झाली नसल्याचं त्याच्या डोळ्यांवरून दिसत होतं. त्यामुळे आम्ही त्याला कार चालवू नको सांगितलं होतं. मात्र तो ऐकला नाही. कार हळू चालव असंही आम्ही त्याला सांगितलं. मात्र त्यानं सुसाट वेगात पळवली, असं रिनानं पोलिसांना सांगितलं. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या काही सेकंदांपूर्वी मर्चंटच्या दोन्ही मित्रांना डुलकी लागली होती. यासोबतच मर्चंटलादेखील डुलकी लागली असावी अशी शक्यता पोलीस सुत्रांनी बोलून दाखवली. याच कारणामुळे अपघात झाल्याचा संशय पोलिसांना आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.