या कार्यक्रमात बोलताना माजी हवाई दल प्रमुख म्हणाले, ‘जेव्हा झाली तेव्हा तुमच्यापर्यंत चलन पोहोचवण्याचं काम आम्ही केलं होतं. जर २० किलोच्या एका बॅगमध्ये एक कोटी रुपये येतात, तर आम्ही किती कोटी रुपये पोहोचवले हे मी सांगूही शकत नाही.’ धानोआ यांनी प्रझेंटेशनच्या एका स्लाईडमध्ये दाखवलं की, देशाची सेवा करण्यासाठी हवाई दलाने ३३ अभियान राबवले आणि ६२५ टन नोटा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवल्या.
धानोआ ३१ डिसेंबर २०१६ ते ३० सप्टेंबर २०१९ या काळात हवाई दल प्रमुख होते. टेकफेस्ट कार्यक्रमात त्यांनी राफेल खरेदीविषयी जो वाद झाला, त्याचाही उल्लेख केला. या प्रकारच्या वादांमुळे संरक्षण व्यवहार धीम्या गतीने होतात आणि याचा परिणाम सैन्यावरही होतो.
बोफोर्स तोफा तेव्हा सर्वोत्कृष्ट होत्या, तरीही बोफोर्स व्यवहार (राजीव गांधी सरकारच्या काळात) देखील वादात सापडला होता, असं ते म्हणाले. गेल्या वर्षी बालाकोट एअर स्ट्राईकनंतर झालेल्या चकमकीत विंग कमांडर अभिनंदन यांच्याकडे मिग २१ च्या ऐवजी राफेल विमान असतं, तर परिणाम वेगळा दिसला असता, असंही ते म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times