मुंबईः गेल्या आठ दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार असून येत्या ४ व ५ ऑगस्ट रोजी मुंबई शहर व उपनगरातील काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील समुद्र किनारे व समुद्र किनाऱ्यालगतचा परिसर इत्यादी ठिकाणी नागरिकांनी जाणं टाळावं तसंच एखादया ठिकाणी पाणी साचले असल्‍यास त्‍याठिकाणी जाणेही टाळावे, असे आवाहन महानगरपालिकेच्‍या आपत्‍कालीन व्‍यवस्‍थापन खात्‍याद्वारे करण्‍यात आले आहे. ()

तसेच या विभागीय नियंत्रण कक्ष व इतर सर्व नियंत्रण कक्षांना ‘हाय अलर्ट’ देण्यात आला आहे. व सर्व विभागीय नियंत्रण कक्षांना आवश्यक मनुष्यबळ साधनसामुग्रीसह सज्ज ठेवण्याच्या सूचना ही देण्यात आल्या आहेत.

वाचाः

पर्जन्य जलवाहिन्या विभागाची ६ पंपिग स्टेशन व २९९ पंप ठिकाणी बसविण्यात आले आहेत. अग्निशमन दलास त्यांची पूर बचाव पथके आवश्यक त्या मनुष्यबळासह व साधनसामुग्रीसह ६ प्रादेशिक समादेशन केंद्रांवर तैनात ठेवण्यास सांगण्यात आली आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या (NDRF) ३ तुकड्यांना अणीबाणी परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ मदतीकरिता तत्पर रहाण्याच्या सूचना पालिकेकडून देण्यात आल्या आहेत.

भारतीय तटरक्षक दल, नौसेना यांच्या समन्वय अधिका-यांना कुलाबा वेधशाळेचा अंदाज सांगण्यात आला असून मदतीकरिता तत्पर रहाण्याचे आदेश देण्यात आलेआहेत. बेस्‍ट (बीईएसटी) (वाहतूक व विद्युत) आणि अदानी एनर्जी यांना सर्व सबस्टेशन ‘हाय अलर्ट’ वर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच त्यांची मदत पथके तत्पर ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

वाचाः

मिठी नदीच्या पातळीत वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्यास क्रांतीनगर व इतर परिसरातील नागरिकांच्या तात्पुरत्या स्थलांतराची व्यवस्था करण्याच्या सूचना सहाय्यक आयुक्त, एल विभाग यांना देण्यात आल्या आहेत. शिक्षण अधिकारी यांना महापालिकेच्या २४ विभागांमधील तात्पुरते निवारे म्हणून निश्चित करण्यात आलेल्या महापालिका शाळा त्वरि‍त मदतीकरिता उघडून ठेवण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाद्वारे देण्‍यात आले आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here