सातारा : “तुझ्या बापाचा नोकर आहे का?” असं म्हणत चक्क एका ट्रॅफिक पोलिसानेच होमगार्डला मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ही घटना सातारा जिल्ह्यातील असून याबाबतचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. या घटनेनं गृहरक्षक दलात प्रचंड नाराजी असून संबंधित पोलीस कर्मचाऱ्याविरोधात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज करुनही कोणतीच कारवाई केली जात नसल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय.

प्रशांत पतंग देशमुख सनद नंबर ८८१७ असं मारहाण झालेल्या होमगार्डचे नाव आहे. तर पोलीस हवालदार राजपूत यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. याबाबत होमगार्ड प्रशांत देशमुख यांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, २१ मार्च रोजी सकाळी त्यांना तासवाडे टोलनाक्यावर नेमणूक होती. त्या ठिकाणी जायला वाहन न मिळाल्यामुळे कर्तव्यावर पोहोचण्यास त्यांना उशीर झाला.
फडणवीस ठाकरे पुन्हा एकत्र येतील? ५ घटनांनी शक्यता बळावल्या, पडद्यामागे बरंच काही घडतंय!
मात्र, वेळेत न पोहचल्यामुळे ट्रॅफिक हवालदार राजपूत यांनी होमगार्ड प्रशांत देशमुख यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन दमदाटी करत कानशिलात लगावली. या प्रकाराने गृहरक्षक दलामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. याबाबतचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. “तुझ्या बापाचा नोकर आहे का?” असं पोलीस हवालदार यामध्ये म्हणताना दिसत आहे. त्यानंतर होमगार्ड सुद्धा त्यांना उलट उत्तरे देत आहेत. दोघांमध्ये जोरदार हमरीतुमरी झालेली पाहायला मिळत आहे.

हवालदार राजपूत यांनी होमगार्ड देशमुख यांना केलेली मारहाण आणि वादावादीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजपूत यांच्या कृतीचा नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला. त्यामुळे सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख याबाबत काय कारवाई करणार याकडे गृहरक्षक दलातील कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

राज ठाकरेंच्या भाषणानंतर सांगली पालिका ॲक्शन मोडमध्ये, अनधिकृत मशीद बांधकामावर तोडक कारवाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here