मंगळवारी म्हणजे २१ मार्च रोजी कापसाच्या दरात ४० रुपयांनी वाढ होऊन ७ हजार ८७५ पासून ८ हजार २९५ रूपयांपर्यत प्रतिक्विंटल प्रमाणे कापसाचे भाव होते. अशा प्रकारे मागील तीन दिवसात कापसाच्या दरात ५५ रुपयांनी वाढ झाली आहे. अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कापसाला ७ हजार ७०० पासून ८ हजार ११८ रूपयांपर्यत भाव होता. सरासरी भाव ७ हजार ८०० रुपये इतका मिळाला. पण इथे कापसाची आवक अतिशय कमी होती.
अकोल्यात तुरीचे दर स्थिरावले असून आज अकोल्याच्या कृषी बाजारात तुरीला ६ हजारापासून ८ हजार ४५० रूपयांपर्यंत प्रतिक्विंटल प्रमाणे भाव मिळाला. सरासरी भाव ७ हजार ९०० इतका असून २ हजार ४६६ क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे. मंगळवारी तुरीचे दर कमीत कमी ५ हजार ५०० पासून जास्तीत जास्त ८ हजार ५०५ रूपयांपर्यंत होते. गेल्या चार ते पाच दिवसाच्या तुलनेत तुरीच्या आवकमध्ये वाढ झाली असून आज पुन्हा तुरीच्या दरात ५५ रुपयांनी घसरण झाली आहे. तर, अकोटच्या बाजारात तुरीला ७ हजार ६०० पासून ८ हजार ३५५ रूपांपर्यंत प्रतिक्विंटल प्रमाणे भाव मिळाला असून इथे ६० रुपयांनी तुरीच्या दरात वाढ झाली आहे. तर तुरीची आवक ९२५ इतकी क्विंटल झाली होती.
अकोल्यात हरभऱ्याला कमीत कमी ४ हजार पासून जास्तीत जास्त ४ हजार ८४५ इतका भाव मिळाला असून सरासरी भाव ४ हजार ५०० इतका होता. अन् हरभऱ्याची आवक ४ हजार २६६ इतकी क्विंटल इतकी झाली. तसेच पांढऱ्या हरभऱ्याला ९ हजार २०५ रूपयांपर्यंत भाव होता. तर लोकल गव्हाला २ हजार पासून जास्तीत जास्त २ हजार ६५५ इतका असून सरासरी भाव २ हजार ३२५ रूपये इतका होता. अकोटच्या बाजारात ४ हजार ३७५ पासून ४ हजार ८५० रूपयांपर्यंत प्रतिक्विंटल प्रमाणे हरभऱ्याला भाव मिळाला. इथे १ हजार ५३० इतकी क्विंटल हरभऱ्याची खरेदी झाली आहे.