मुंबई : मुंबई मेट्रो प्रवाशांना आता २४ तासांत अवघ्या ८० रुपयांत अमर्याद प्रवास करता येणार आहे. तर तीन दिवसांसाठी २०० रुपयांत अनलिमिटेड प्रवास करता येणार आहे. याखेरीज अन्य पास योजनादेखील मेट्रो प्रशासनाने गुरूवार, २३ मार्चला जाहीर केल्या. मेट्रो २ अ व मेट्रो ७ साठी या योजना लागू असतील.मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएअंतर्गत महामुंबई मेट्रो संचालन कंपनी लिमिटेड (एमएमएमओसीएल) ही कंपनी मेट्रो २ अ व मेट्रो ७ चे कार्यान्वयन करते. मेट्रो २ अ ही डीएन नगरजवळील अंधेरी पश्चिम ते दहिसर पूर्व व मेट्रो ७ ही अंधेरी पूर्वेकडील गुंदवली ते आनंदनगर (दहिसर), अशी आहे.

याअंतर्गत प्रवाशांनी ३० दिवसांत एकूण ४५ फेऱ्या मारल्यास त्यावर त्यांना १५ टक्के सवलत मिळेल. तर ६० फेऱ्या मारल्यास २० टक्के सवलत मिळेल. मात्र या दोन्ही फेऱ्यांसाठी आगाऊ तिकीट काढावे लागेल. या प्रकारच्या चारही योजनांचे शुल्क प्रीपेड स्वरुपात ‘मुंबई १’ (मुंबई वन) या कार्डच्या माध्यमातून आकारले जाईल.

मुंबई मेट्रोचे प्रवासी त्यांचे ‘मुंबई १’ हे एकात्मिक प्रवास कार्ड मुंबई मेट्रोच्या तिकीट काऊंटर आणि कस्टमर केअर काउंटरवर अल्प कागदपत्रांसह सहज मिळवू तसेच रिचार्ज करू शकतात. या कार्डचा वापर रिटेल स्टोअरमध्ये आणि बेस्ट बस प्रवासादरम्यानदेखील करता येतो. ‘एमएमएमओसीएल’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एसव्हीआर श्रीनिवास यांनी या योजना घोषित केल्या.

मला चांगल्या पगाराची नोकरी, पण मन लागत नाही; पिंपरीत २७ वर्षीय अभियंत्याने आयुष्य संपवलं
मुंबईच्या पश्चिम उपनगरांना उत्तर व दक्षिण जोडणाऱ्या मेट्रो २ अ व मेट्रो ७ या प्रकल्पाच्या मार्गिकेवरील दुसऱ्या टप्प्याचा प्रवास दोन महिन्यांपूर्वी पूर्णपणे सुरू झाला. यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांच्या वेळेची तसेच इंधनाची मोठी बचत होताना दिसत आहे. या मार्गांमुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीतूनही दिलासा मिळाला आहे.

लालपरी सक्षम नारी म्हणत भाजप कार्यकर्त्यांसोबत चित्रा वाघ यांचा एसटीतून प्रवास

मेट्रो २ अ मार्गिकेचा दहिसर पूर्व ते डहाणूकरवाडी व मेट्रो ७ चा दहिसर पूर्व ते आरे असा पहिला टप्पा गेल्या वर्षी एप्रिलमध्येच सुरू झाला होता. आता मेट्रो २ अ चा वळनई ते अंधेरी पश्चिम तर मेट्रो ७ चा गोरेगाव पूर्व ते गुंदवली असा दुसरा टप्पा सुरू झाला. त्यामुळे मुंबईकरांना एका दिशेने सलग १६ ते १८ किलोमीटरची संलग्नता मिळाली आहे.
पप्पांनी पंखे पुसताना सूसू केली, चिमुकल्याने दादाला सांगितलं; नंतर समजलं बँक मॅनेजरने गळफास घेतला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here