बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेस नेते आणि शेगाव पंचायत समितीच्या माजी उपसभापतींनी आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुंडलिक दत्तू पारस्कर (वय ४९ वर्ष) यांनी आपल्या शेतात गळफास घेऊन आयुष्याची अखेर केली. आज, २३ मार्च रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे.सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे पारस्कर यांनी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविली जात आहे. काँग्रेस नेते पुंडलिक दत्तू पारस्कर यांनी २००७ ते २०१२ या कालावधीत शेगाव पंचायत समितीचे उपसभापतीपद भूषवले होते.

पारस्कर अतिशय मनमिळावू स्वभावाचे होते. मात्र कर्जबाजारीपणामुळे त्यांचा बळी गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे. गेल्या काही वर्षांपासून शेती ही सातत्याने तोट्यात जात असून, नापिकी व बँका तसेच खासगी कर्जामुळे पुंडलिक पारस्कार हे त्रस्त झाले होते. त्यामुळे नैराश्यात गेल्याने त्यांनी आज दुपारी बारा वाजताच्या सुमारास पहुरजीरा येथील आपल्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

पदरात १५ दिवसांचं बाळ, २५ वर्षीय माऊलीने रुग्णालयाच्या बाथरुममध्येच स्वतःला संपवलं
या घटनेची माहिती कळताच गावकरी व पोलिसांनी तातडीने घटनास्थळी घाव घेतली. पारस्कर यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे. काही काळ त्यांनी शेगाव पंचायत समितीचे उपसभापती म्हणूनही काम पाहिले होते. अत्यंत मनमिळावू स्वभाव व कष्टाळू शेतकरी म्हणूनही ते सर्वदूर परिचित होते. त्यांच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. राज्य सरकारने त्यांच्या कुटुंबीयास तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी पुढे आली आहे.

पुणे-बंगळुरू महामार्गावरील वृक्षांच्या कत्तलीनंतर सयाजी शिंदे आक्रमक

वारंवार खाजगी आणि सावकारी कर्ज अंगावर मुलाबाळांचं लग्न, शिक्षण, आजारपण या एक ना अनेक विवंचनांतून जात असताना एक दिवस कुटुंबप्रमुख आपल्या परिवाराला सोडून स्वतःची जीवन यात्रा संपवतो. दुसऱ्यांना धीर देणारे पुंडलिक पारस्कर यांच्यासारखे राजकीय व्यक्तिमत्व सदैव सुखदुःखात धावून जात असे. इतरांना धीर देता देता तेच व्यक्तिमत्व स्वतःच्या हातून कर्जबाजारीपणामुळे जीवनयात्रा संपवत असल्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.

पप्पांनी पंखे पुसताना सूसू केली, चिमुकल्याने दादाला सांगितलं; नंतर समजलं बँक मॅनेजरने गळफास घेतला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here