पुणे (पिंपरी-चिंचवड) : पुण्यातल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत काम करत असलेल्या आपल्या मुलाला “कामावर का गेला नाहीस?” याची विचारणा केल्याचा राग मनात धरून स्वत:च्या आईच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक घालून हत्या केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बुधवारी पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ९ मार्च रोजी घडला होता. प्रयागाबाई अशोक शिंदे (वय ५८) असं हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव असून विश्वास अशोक शिंदे (वय ३०) असं हत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वास हा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कचरा गाडीवर काम करतो. त्याला दारूचे व्यसन आहे. विश्वास हा पिंपरी येथे आईसोबत राहात होता. मागील काही दिवसांपासून तो कामावर जात नव्हता. त्यावर आईने त्याला विचारले “कामावर का जात नाहीस?” तसेच त्याला दारू पिण्यावरून आई सतत रागवत होती. दारू सोडण्याची मागणी करत होती. याचा राग विश्वासच्या डोक्यात होता.

IPL 2023 मध्ये अजबच नियम, विकेटकिपरमुळे दिला जाणार आता नो बॉल, पाहा काय आहे कारण
विश्वासने रागाच्या भरात सिमेंटचा ब्लॉक आईच्या डोक्यात घातला. त्यामुळे आई गंभीर जखमी झाली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर आरोपी मुलगा विश्वास शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.

आई आणि मुलाच्या नात्यात मुलाने हा प्रकार केल्याने सर्वांना धक्का बसला आहे. दारूचे व्यसन माणसाला कुठे घेऊन जाऊ शकते याचं हे उदाहरण म्हटलं तरी वावगे ठरणार नाही. मात्र, दारूचे व्यसन करून आपले आयुष्य वाया घालवू नका. त्यापेक्षा चांगले काम करा आणि आपल्या परिवारासोबत चांगले राहा, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वसंत डोंबे यांनी फिर्याद दिली आहे.

भाजपने राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारले, अजितदादा खवळले, सत्ताधाऱ्यांना झाप झाप झापले!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here