नवी दिल्ली: रेल्वेत काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याचे तिच्या कामासाठी खूप कौतुक होत आहे. या महिला कर्मचाऱ्याने विना तिकीट आणि अनियमित प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांकडून तब्बल १ कोटी रुपयांहून अधिकचा दंड वसूल केला आहे. त्यामुळे सध्या ही कर्मचारी चर्चेचा विषय ठरली आहे.रोझलिन अरोकिया मेरी दक्षिण रेल्वेमध्ये मुख्य तिकीट निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. १ कोटींचा दंड वसूल करणाऱ्या त्या रेल्वेच्या पहिल्या महिला तिकीट तपासणी कर्मचारी ठरली आहे.

मेरीचे फोटो रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आले आहेत. या फोटोंमध्ये ती प्रवाशांची तिकिटे तपासताना दिसत आहे. याशिवाय ती दंडही आकारत आहे.

एसटीच्या तिकीट दरात ५० टक्के सूट; सरकारच्या निर्णयाचं महिलांकडून कौतुक

रेल्वे मंत्रालयाने आपल्या ट्विटमध्ये लिहिले – ती पूर्ण निष्ठेने आपले काम करत आहे. रोझलिन अरोकिया मेरी या दक्षिण रेल्वेमध्ये मुख्य तिकीट निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. तिकीट नसलेल्या आणि अनियमित रेल्वे प्रवाशांकडून त्यांनी १.०३ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.
बेडरूममध्ये गेली, पलंगावरील चादर बदलणार तेवढ्यात तिला तो दिसला अन्…
रेल्वे मंत्रालयाच्या या ट्विटनंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी त्यांच्या कामाचं कौतुक केले आहे आणि अभिनंदन केले. अशा समर्पित महिला कर्मचाऱ्यांची देशाला गरज आहे, जी भारताला महासत्ता बनवू शकते, असं एकाने लिहिले. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, मला अभिमान आहे की मी तुमचा मित्र आहे. मी तुम्हाला ओळखतो, त्यामुळे तुमच्या कर्तृत्वाने मला फारसं आश्चर्य वाटत नाही. कर्तव्य बजावत असताना तुम्ही समर्पण, प्रामाणिकपणा दाखवली आहे.

१ कोटी ५५ लाखांचा दंड वसूल

एक प्रसिद्धीपत्रक जारी करताना दक्षिण रेल्वेने सांगितले की मेरी व्यतिरिक्त, आणखी दोन तिकीट तपासणी कर्मचार्‍यांनी १ कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड वसूल केला आहे. या सर्वांनी एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ दरम्यान हा दंड वसूल केला आहे. चेन्नई विभागाचे उपमुख्य तिकीट निरीक्षक एस नंदा कुमार (एस नंदा कुमार) यांनी १ कोटी ५५ लाखांचा दंड वसूल केला. तर वरिष्ठ तिकीट परीक्षक शक्तीवेल यांनी दंड म्हणून १.१० कोटी रुपये वसूल केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here