म. टा. प्रतिनिधी, पुणे : कोयता गँगने धुडगूस घालून दुचाकीस्वाराकडील ४७ लाख रुपयांची रोकड लुटून नेल्याची घटना नाना पेठेत गुरुवारी सकाळी घडली. बँकेत भरणा करण्यासाठी ४७ लाख रुपये रोकड घेऊन जाणाऱ्या दुचाकीस्वाराला अडवून कोयतेधारी टोळक्याने धाक दाखवून लुटले. या घटनेने नाना पेठेत गोंधळ उडाला होता. या प्रकरणी दोघा दुचाकीस्वारांवर समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत मंगलपुरी भिकमपुरी गोस्वामी (वय ५५ वर्ष, रा. मंगळवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. नाना पेठेतील सार्वजनिक रस्त्यावर हा प्रकार घडला. या घटनेची माहिती मिळताच समर्थ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपींचा शोध सुरू केला.

फिर्यादी गोस्वामी खासगी संस्थेत काम करतात. या संस्थेची ४७ लाख २६ हजार रुपये रक्कम व १४ धनादेश घेऊन ते बँकेत चालले होते. सकाळी अकरा वाजताच्या सुमारास ते नाना पेठेतील सिटी सर्व्हे नंबर ३९५ येथील सार्वजनिक रस्त्यावरून जात असताना पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना धक्का दिला. फिर्यादी यांच्या दुचाकीसमोर गाडी आडवी लावून त्यांना अडवले. त्यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोकड असलेली पिशवी जबरदस्तीने घेऊन ते पसार झाले. या मारहाणीत फिर्यादीच्या उजव्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे.

घर गाठण्याआधीच मृत्यूने गाठलं, कारची धडक, गावापासून २०० मीटर अंतरावर शेतकऱ्याचा अंत
घटनेची माहिती मिळताच पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त संदीपसिंह गिल्ल, अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर, सुनील पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश साठे, प्रमोद वाघमारे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. समर्थ पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पथकांकडून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

चालक उतरताच टेम्पोत जाऊन बसला अन् रिव्हर्स गियर टाकला, टेम्पो थेट विहिरीत !

याआधी जानेवारी महिन्यात पोलिसांनी कोयता गँगचा म्होरक्या बिट्ट्या कुचेकर, साहिल शेख आणि आकाश कांबळे यांना अटक केली होती. त्यांच्याकडून दोन कोयते जप्त करण्यात आले होते. ही कोयता गँगविरोधातील सर्वात मोठी कारवाई मानली जात होती.

तीन ग्लास, पाण्याची बॉटल न् अर्धवट खाल्लेला वडापाव; पण मृतदेहाची ओळख पटली ‘त्या’ खुणेने

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here