अचानक झालेल्या पावसात चिमुकला भिजला, श्रीकांत शिंदेंनी मायेनं जवळ घेत लेकराचं डोकं पुसलं
ठाण्यात करोना सोबत ‘एच ३ एन २’ इन्फ्ल्युएंझा या आजाराने आता डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ठाण्यात ‘एच ३ एन २’ इन्फ्ल्युएंझाचा आकडा १९ वर येऊन पोहचला आहे. त्यातच या आजाराने ठाण्यात पहिला बळी गेल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. ठाण्यात बुधवारी मृत्यू झालेले रुग्ण हे वयोवृद्ध होते आणि त्यांना करोना आणि ‘एच ३ एन २’ अशा दोन्ही प्रकारच्या आजारांची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ‘एच ३ एन २’ चा ठाण्यातील तो पहिला बळी म्हणून नोंदवला गेला आहे.
तर, ठाणे जिल्ह्यात करोना रुग्ण वाढत असताना ठाणे महापालिका हद्दीतही कोरोनाच्या रुग्णांमध्ये हळू हळू वाढ होत आहे. या आठवड्यात करोना उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा तीन वर गेला आहे. यात मृत्यू झालेले तिघे हे रुग्ण ७० वर्षांवरील असून त्यांना सहव्याधी होत्या. त्यातच बुधवारी मृत्यू झालेल्या वृद्धाला खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना ‘एच ३ एन २’ इन्फ्ल्युएंझा या आजाराचीही लागण झाल्याचे वैद्यकीय तपासणी अहवालातून उघड झाले होते.