विवाहबाह्य संबंध आणि मारहाणीचे हे प्रकरण हल्द्वानी टिपीनगर पोलीस चौकी परिसरातील आहे. येथे राहणाऱ्या एका तरुणाने तक्रारीत पोलिसांना सांगितले की, तो पत्नी आणि ६ वर्षांच्या मुलीसोबत राहतो. त्याची पत्नी नैनिताल जिल्ह्यातीलच एका सरकारी शाळेत शिक्षिका आहे. त्याने पोलिसांना सांगितले की, १८ मार्च रोजी तो घरी पोहोचला तेव्हा त्याच्या घराबाहेर एक कार उभी होती.
घराचं दार आतून बंद होतं. त्याने दार ठोठावलं, मात्र बराच वेळ दरवाजा उघडला नाही. काही वेळाने पत्नीने दरवाजा उघडला तेव्हा तिच्यासोबत एक पुरुष होता, असा आरोप पतीने केला आहे. पतीने त्या व्यक्तीला घरी येण्याचं कारण विचारलं, तेव्हा तरुणाच्या पत्नीला राग आला आणि दोघांनी मिळून त्याच्यावर हल्ला चढवला. दोघांनी त्याला बेदम मारहाण केली. तेव्हा पीडित तरुणासोबत असलेल्या एका व्यक्तीने कसंबसं त्याला वाचवलं.
नवऱ्याचं लैच प्रेम; लाडक्या बायकोचा हट्ट, वाढदिवसाला थेट गौतमी पाटीलच्या हातूनच केक कटिंग
पत्नी आणि तिच्या प्रियकराने या तरुणाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप पीडित व्यक्तीने केला आहे. पीडित तरुणाने घरात बसवलेले सीसीटीव्ही तपासले असता पत्नीच्या प्रियकर जेव्हा घरात आला आणि परत गेला तोपर्यंतचा सीसीटीव्ही बंद असल्याचे आढळून आले.
गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये त्याच्या पत्नीने त्याच्यावर चाकूने हल्ला केल्याचा आरोपही या तरुणाने केला आहे. मात्र, उपचारानंतर दोघं पुन्हा एकत्र आले. आता या तरुणाने दावा केला आहे की त्याची पत्नी त्याला खोट्या प्रकरणात अडकवू शकते. इतकंच नाही तर हे दोघे मिळून त्याची हत्याही करु शकतात. हल्द्वानीचे पोलीस अधिकारी हरेंद्र चौधरी यांनी याबाबत सांगितले की, पीडित तरुणाच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.