Mumbai News : मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्तांचे कार्यालय राज्याबाहेर स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी उपसभापतींनीू निवेदन देण्याचे निर्देश दिले आहे.

 

mill
मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्तांचे कार्यालय राज्याबाहेर? सरकारला निवेदन देण्याचा निर्देश
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्तांचे कार्यालय आणि पेटंट ट्रेडमार्कचे कार्यालय गुजरातला स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केला जात असून, यामागे देशाची औद्योगिक राजधानी मुंबई शहराचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गुरुवारी विधान परिषदेत केला. या प्रकरणी त्यांनी स्थगन प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला. तथापि, या प्रश्नी उद्या, शुक्रवारपर्यंत राज्य सरकारने निवेदन सादर करावे असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. या महानगरीत असलेले महत्त्वाची कार्यालये मुंबईतून स्थलांतर करून शेजारच्या राज्यात नेण्यात येत आहेत. मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न असून, त्याला राज्य सरकारची साथ आहे काय, असा प्रश्न करून याविषयी राज्य सरकारने योग्य तो खुलासा करून स्पष्टीकरण देण्याची मागणी दानवे यांनी सभागृहात केली. या मागणीची गंभीर दखल घेऊन उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, राज्यातील उद्योगधंद्यांच्या दृष्टीने वस्त्रोद्योग आयुक्तालय हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

राऊतांवर टीका करताना दादा भुसेंनी शरद पवारांच नाव घेतलं, अजितदादा संतप्त

या संदर्भात सरकारने उद्यापर्यंत विधान परिषदेत निवेदन सादर करावे, जेणेकरून अधिवेशन संपुष्टात येण्याआधी सभागृहातील सदस्यांना या प्रश्नाचे उत्तर मिळेल. यानंतर सरकारतर्फे उद्यापर्यंत निवेदन सादर करण्यात येईल, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सभागृहास सांगितले

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here