म.टा. प्रतिनिधी, नागपूर: गेल्या काही वर्षांपासून देशातीलच नाही तर जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीतही नागपूरचा क्रमांक लागू लागला आहे. यंदाच्या उन्हाळ्यात तसा अनुभवही आला. मात्र यंदा पहिल्यांदाच देशातील सर्वाधिक पर्जन्यमान होणाऱ्या शहरांच्या यादीत नागपूरचा क्रमांक लागला आहे. रविवारी ३ ऑगस्ट रोजी नागपुरात देशातील चौथ्या क्रमांकाच्या पर्जन्यमानाची नोंद करण्यात आली.

वाचाः

गेल्या तीन दिवसांपासून शहरात दमदार सरी कोसळत आहेत. रविवारी मध्यरात्रीनंतर शहरात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. रविवारी सकाळी ८.३० ते सोमवारी सकाळी ८.३० या दरम्यान शहरात अतिवृष्टीची (१२ सेंटीमीटर अर्थात ११७.१ मीमी पावसाची) नोंद करण्यात आली आहे. यंदाच्या मोसमातील ही दुसरी अतिवृष्टी आहे. यापूर्वी जून महिन्यात एक दिवस १०० मीमी पावसाची नोंद करण्यात आली होती. रविवारी देशात केरळ राज्यातील वडाकरा येथे सर्वाधिक १६ सेंटीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. त्याखालोखाल तामीलनाडूमधील देवाला येथे १५, तर अंदमान निकोबारमधील लाँग आयलँड येथे १३ आणि नागपूर येथे १२ सेंटीमीटर पावसाची नोंद करण्यात आली.

वाचाः

नागपुरात अतिवृष्टी

गेल्या आठवड्यात पावसात खंड पडला होता. मात्र हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार शनिवारपासून शहरात तसेच विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये दमदार पावसाला सुरुवात झाली. रविवारी संध्याकाळी शहरातील सर्वच भागात चांगला पाऊस झाला. पुढे रविवारी मध्यरात्रीनंतर शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले. तसेच काही पुलसुद्धा पाण्याखाली गेल्याने वाहतूकीस अडथळे निर्माण झाले. मंगळवारीसुद्धा नागपुरात काही भागात अतिवृष्टीचा इशारा आहे. पुढे पावसाचा जोर कमी होणार असला तरीही शुक्रवारपर्यंत पावसाचा अंदाज कायम आहे.

ठिकाण पर्जन्यमान

वडाकरा (केरळ) – १६

देवाला (तामीलनाडू) – १५

लॉँग आयलँड (अंदमान निकोबार) – १३

नागपूर- १२

जुन्नरदेव (मध्य प्रदेश) – ११

मनी (कर्नाटक) – ११

(टीप: पर्जन्यमान सेंटीमीटरमध्ये )

(स्रोत : केंद्रीय हवामान खाते)

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here