सोलापूर : घरगुती काम करण्यासाठी भाड्याने लावलेल्या रिक्षाच्या चालकाने महिलेला ज्युसमध्ये गुंगीचे औषध घालून दिले. यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना सोलापूर शहरात घडली आहे. याप्रकरणी सुनील उर्फ सोमनाथ धर्मराज आचलारे ( वय ३५, रा. हत्तुरे वस्ती) याच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.संशयित आरोपी रिक्षावाल्याने पीडित महिलेला गुंगीचे औषध दिले आणि अत्याचार केला. एवढचं नव्हे तर त्याचे न्यूड फोटो देखील मोबाइलमध्ये टिपले. नग्न फोटो पतीला दाखवतो अशी धमकी देत एप्रिल २०२२ पासून पीडितेवर सतत अत्याचार करत राहिला. धमकी देत पीडित महिले कडून जवळपास एक लाख रुपयांची रक्कम देखील उकळली. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विरोधात भा.द.वि. 376,376(अ), 384, 385, 504, 506 प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे. अधिक तपास एपीआय गायकवाड करत आहेत.

घरगुती कामासाठी रिक्षा लावली होती

पीडित महिलेने या प्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घरगुती कामासाठी, भाजीपाला आणण्यासाठी, हॉस्पिटलला जाण्यासाठी रिक्षा लावली होती. पीडित महिला ही नेहमी सुनील अचलारे याच्या रिक्षात जात होती. नेहमीचा रिक्षा वाला असल्याने पीडित महिलेचे मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले होते. एप्रिल २०२२ मध्ये पीडित महिलेची तब्येत ढासळल्याने ती एका खासगी हॉस्पिटलला उपचारासाठी रिक्षामध्ये गेली होती. यावेळी रिक्षावाल्याने विश्वासघात करत तिला ज्युसमधून गुंगीचे औषध दिले. पीडितेला गुंगी चढताच तिला सोलापूर शहरानजिक असलेल्या एका लॉजमध्ये घेऊन गेला. तिच्यावर अत्याचार करत तिचे न्यूड फोटो मोबाइलमध्ये काढले. पीडित महिला ही शुद्धीवर आल्यावर तिच्या लक्षात आले. तिने रिक्षावाल्यालाला याबाबत विचारले असता न्यूड फोटो दाखवत तिला धमकी दिली. तुझ्या पतीला फोटो दाखवतो, तुझ्या पतीला मारून टाकतो किंवा मी स्वतः आत्महत्या करतो, अशी धमकी दिली. घडलेल्या घटनेमुळे घाबरून पीडित महिलेने वाच्यता केली नव्हती.

संजय राऊतांनी आम्हाला साथ दिली पण त्यांचा आवाज दाबला जातोय; बार्शीतील निर्भयाच्या आईचा टाहो

वर्षभरापासून अत्याचार सुरूच होता

रिक्षावाला संशयित आरोपी सुनील अचलारे याचा अत्याचार दिवसेंदिवस वाढतच चालला होता. पीडितेने त्याला वेळोवेळी रोख रक्कम, ऑनलाइन असे जवळपास एक लाख रुपये दिले होते. न्यूड फोटो पतीला दाखवण्याची धमकी देत ब्लॅकमेल करत पीडितेला विविध ठिकाणी घेऊन जात पुन्हा अत्याचार केले. पीडित महिलेला अत्याचार सहन न झाल्याने अखेर तिने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात २२ मार्च २०२३ ला फिर्याद दिली. या फिर्यादीवरून आरोपी आचलारे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने सोलापुरातील रिक्षाचालकांवरील विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

बार्शी निर्भया प्रकरण: आई म्हणते – मोठ्या मुलीवरही अत्याचार, पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here