Ratnagiri News : जैतापूरमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी दुर्दैवी घटना घडली. मासे पकडण्यासाठी गेलेला तरुण उशिरापर्यंत घरी परतलाच नाही. यामुळे कुटुंबीय घाबरले आणि त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले. पोलीस तपासत अखेर तरुणाचा मृतदेहच हाती आला.

 

ratnagiri news
मासे पकडण्यासाठी खाडीत गेला, पण घरी परतलाच नाहीच; अनर्थ घडला, तरुणाचा बुडून मृत्यू
राजापूर, रत्नागिरी : राजापूर तालुक्यात जैतापूर समुद्राच्या खाडीत मासे पकडण्यासाठी गेलेल्या ३८ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. राजेंद्र अंकुश लासे (रा. दळे जैतापूर) असे या तरुणाचे नाव आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी बुधवारी दुपारी दोन वाजता मासे पकडण्यासाठी हा तरुण गेला. पण घरी परत न आल्याने बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.गुढीपाडव्याच्या दिवशी बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास जैतापूर आगरवाडी येथे जैतापूर पूलाखाली धाऊलवल्ली खाडीत मुळे (शिंपल्या ) काढण्यासाठी गेलेला ३८ वर्षीय तरुणाचा समुद्राच्या खाडीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. राजेंद्र अंकुश लासे (रा. दळे जैतापूर) असे या मृत्यू झालेल्या तरुणाच नाव आहे. सणाच्या दिवशी राजेंद्र याच्या झालेल्या आकस्मात मृत्यूने अवघ्या जैतापूर परिसरावर शोककळा पसरली आहे.

बारसू रिफायनरी परिसरात राजकीय नेते, अधिकारी, परप्रांतीयांची जमीन खरेदी; काँग्रेस नेत्याचेही नाव, खळबळजनक दावा
कोकण-पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या रेल्वे मार्गाच्या आशा पल्लवीत, प्रकल्प गेला होता बासनात
राजेंद्र लासे हा तरुण बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास मुळे म्हणजेच शिंपल्या काढण्यासाठी खाडीत गेला होता. पण तो संध्याकाळ होऊनही घरी परतला नाही. यामुळे ४५ वर्षीय भाऊ महेंद्र अंकुश लासे यांनी नाटेतील सागरी पोलीस ठाण्यात भाऊ बेपत्ता झाल्याची खबर दिली होती. त्यानंतर नाटे पोलिसांनी तातडीने शोध मोहीम हाती घेतली. त्याचा शोध सुरू असता याच खाडीच्या दरम्यान त्याचा मृतदेह मिळाला आहे. या राजापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास नाटे सागरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील करीत आहेत. जैतापूर सागरी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास जैतापूर पोलीस करत आहेत.

दरवाजा उघडाच ठेवा, सगळे जातील, हम दो हमारे दो राहतील, मग कुटुंब हीच जबाबदारी : एकनाथ शिंदे

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here