चेन्नई: यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान भारतातच रंगणाऱ्या वनडे वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघव्यवस्थापनाने आयपीएलच्या संघांसाठी मार्गदर्शकतत्वे जारी केली आहेत. नियमित टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंची दमछाक होणार नाही, याची खबरदारी घ्यायची आहे; पण या मार्गदर्शकतत्वांचे पालन होईल की नाही, याबाबत खुद्द कर्णधार रोहित शर्मालाच शंका आहे! तशी प्रतिक्रियाच रोहितने बुधवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका गमावल्यानंतर दिली.भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिका गमावल्यानंतर अवघ्या नऊ ते दहा दिवसांत यंदाच्या आयपीएलला सुरुवात होते आहे. तर आयपीएलचा समारोप झाल्यानंतर काही दिवसांत म्हणजेच ७ जूनपासून लंडनला जागतिक कसोटी स्पर्धेची अंतिम लढत होईल.

ओपन चॅलेंजच समजा; भारतीय खेळाडूचे हे ५ विक्रम मोडण्याची कोणाची हिम्मत झाली नाही
‘आयपीएल संघांना मार्गदर्शकतत्वे देऊन झाली आहेत. चेंडू आता त्यांच्या ‘कोर्टात’ आहे. कारण लीग संपेपर्यंत खेळाडूंवर संघमालकांची मालकी असेल. त्यामुळे कुणाला किती विश्रांती द्यायची, कार्यभार हलका कसा करायचा हे संघमालकांवर असेल. अशा परिस्थिती खेळाडूंनीच पुढाकार घेत आपल्या शरीराला अधिकाधिक विश्रांती कशी मिळेल, याची खबरदारी घ्यावी. हे सगळे (भारताचे प्रतिनिधित्व करणारे) खेळाडू सूज्ञ आहेत. आपल्या शरीराची खूपच पिळवणूक होत असल्याचे वाटले तर खेळाडूंनीच संघव्यवस्थापनाच्या ते लक्षात आणून द्यावे. त्याबद्दल संवाद साधावा आणि एक, दोन सामन्यांची विश्रांती मागून घ्यावी. मात्र हेदेखील होईल की नाही, याबाबत मी साशंक आहे’, रोहित विस्तृत उत्तर देताना अन् काय घडू शकते हेदेखील स्पष्टच सांगतो.

मधल्या फळीतील भारताचा तरणाबांड फलंदाज श्रेयस अय्यर आयपीएलला सुरुवात होण्याआधीच पाठदुखीने बेजार आहे. तो आयपीएललाही मुकण्याची शक्यता आहे. २८ वर्षांच्या श्रेयसला गेल्या डिसेंबरमधील बांगलादेश दौऱ्यानंतर पाठदुखीचा त्रास जाणवू लागला. यामुळेच मायदेशातील न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतूनही त्याने माघार घेतली होती.

IPLमधील कर्णधारांना मिळणार ‘सुपर पॉवर’; अखेरच्या क्षणी घेता येणार मॅचचा निकाल बदलवणारा निर्णय
श्रेयसने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेद्वारे पदार्पण करत दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत भागही घेतला; पण पाठदुखीने पुन्हा डोके वर काढले. त्याआधीपासून भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह जायबंदी आहे, तर प्रसिद्ध कृष्णही दुखापतीतून सावरलेला नाही. टीम इंडियाच्या जायबंदी खेळाडूंची यादी वाढतच चालल्याने कर्णधार रोहितला चिंता वाटणे सहाजिकच आहे.

‘सचिन व्हायचे की विनोद कांबळीच्या मार्गावर जायचे

‘हो, चिंता वाटते; कारण नियमित अंतिम अकरामध्ये असणारे खेळाडू जायबंदी आहेत. होय, दुखापतीतून सावरण्यासाठी हे खेळाडू मनापासून प्रयत्न करतात. आम्ही आळीपाळीने खेळाडूंना विश्रांती देत असल्याचे तुमच्या लक्षात आलेच आहे. खेळाडूंवरील कार्यभाराच्या व्यवस्थापनाअंतर्गत हे सगळे सुरू आहे. क्रिकेट स्पर्धांचा कार्यक्रम व्यग्र असल्याने दुखापती होणारच. त्यामुळे याचा खूप विचार करणे नको वाटते. ज्या गोष्टी खेळाडू म्हणून आमच्या नियंत्रणात आहेत, त्याचा विचार करून त्यानुसार मार्गक्रमण करत रहायचे’, रोहित नमूद करतो.

क्रिकेटमध्ये सर्व विक्रम मोडले जातील, पण हा रेकॉर्ड मोडणे अशक्य; भारताच्या गोलंदाजाने…
दुखापतींचा ससेमिरा खेळाडूंनाही नकोसा असतो. रोहितही या मुद्यावर प्रकाशझोत टाकतो. ‘कोणताही खेळाडू आपल्या संघाचे किंवा देशाच्या संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी सोडू इच्छित नाही. त्यामुळे दुखापतींमुळे खेळापासून दूर राहणे खेळाडूंसाठी मानसिकदृष्ट्या त्रासदायक ठरते. हे दुःखद आहे, पण आम्ही काय करू शकतो? आम्ही दुखापती ओढवून घेत नाही. आम्हा खेळाडूंना फिट ठेवण्यासाठी आणि दुखापतींमधून आमची लवकर सुटका करण्यासाठी अनेक मंडळी राबत असतात. यामुळेच संघव्यवस्थापन खेळाडूंना थोड्याफार अंतराने विश्रांती आणि विराम देत आहे’, याकडे रोहित लक्ष वेधतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here