विरारः १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना विरारमध्ये बुधवारी घडली आहे. याप्रकरणी दोन आरोपींनी विरार पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Woman Gang-Raped in Virar)विरारमधील एका परिसरात १९ वर्षीय तरुणी तिच्या मित्रासह बुधवारी संध्याकाळी बसले होते. त्यावेळी त्याठिकाणी दोन जण आले आणि त्यांनी प्रियकराच्या गळ्यातील सोन्याचे पेंडल खेचून पळ काढला. मात्र, दोघांनी ते पेंडल विकण्याचा प्रयत्न केला मात्र कोणीही त्यांच्याकडून ते विकत घेतले नाही. म्हणून ते दोघे ज्या ठिकाणी तरुणी आणि तिचा प्रियकर बसले होते परत त्याच ठिकाणी आले.
यावेळी दोघा आरोपीची नियत फिरली आणि दोघांनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. दरम्यान, या दोघांना विरोध करताना तरुणीच्या मित्राने बाजूला पडलेली काचेची बाटली एकाच्या डोक्यावर मारली. त्यानंतर दोन्ही आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केले. याबाबत पोलिसांना कळवल्यानंतर विरार पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

तरुणीला उपचारासाठी दाखल करून, त्यांनी फरार आरोपींचा शोध सुरू केला. यावेळी पोलिसांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवरुन एक जखमी आरोपी उपचारांसाठी दवाखान्यात येईल, अशा सूचना दिल्या होत्या दरम्यानच्या काळात फरार आरोपींपैकी एक जण जखमी असल्याने एका डॉक्टरकडे उपचारासाठी गेला होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. तेव्हा विरार पोलिसांनी तात्काळ दोघांनाही ताब्यात घेऊन अटक केली. याप्रकरणी आरोपींवर जबरी चोरी, खंडणी, बलात्कार, अनैसर्गिक बलात्कार अशा स्वरूपाच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.
तेलाचे डबे, साबुदाण्याची पोती; काजू-बदाम, साबण; लाखोंच्या मालावर डल्ला, चोरी करण्यासाठी थेट कार