पहिल्या पत्नीचा पतीसोबत शेती वाटून घेण्यावरून कोर्टात वाद सुरू आहे. तसेच पहिल्या पत्नीचा मुलगा ऋषिकेश हा अधूनमधून गावाकडे येत असे. तो सज्ञान झाल्याने आईच्या सांगण्यावरून वडिलांसोबत जमीन वाटून देण्याविषयी वाद घालायचा. काल २३ मार्च रोजी गुरुवारी ऋषिकेश भार्डी गावात आला. गावात येऊन त्याने वडिलांचे घर गाठले. आपला सावत्र लहान भाऊ विराजला गोडीगुलाबीने डाव्या कालव्याच्या बाजूच्या शेतात नेले. पण शेतीच्या वाटणीचा राग त्याच्या डोक्यात होताच. शेतात विराजला नेऊन त्याने रुमालाने विराज याचा गळा आवळला. गळा आवळूनही तो मरत नाही असे वाटल्याने त्याने त्याच्या नाकातोंडात चिखल कोंबला. या अचानक झालेल्या हल्ल्याने आणि श्वास गुदामरल्याने लहानग्या विराजचा तडफडून जागीच मृत्यू झाला.
विराज संपला याची खात्री झाल्यावर मी माझ्या भावाला शेतात मारून टाकले असे वस्तीवर येऊन गावातील मित्रांना त्याने सांगितले. मित्रांना त्याने विराजला मारल्याचे ठिकाण दाखवून सायकलवरून त्याने पळ काढला. गावातील मुलेदेखील या घटनेने भांबावून गेले. त्यांनी गावात येऊन हा प्रकार सांगितला. गावकऱ्यांनी ताबडतोब धाव घेतली आणि ऋषिकेशचा शोध सुरू केला. सायकल वर पळून जाणाऱ्या ऋषिकेश ला गावकऱ्यांनी पकडून आणले. पोलिसांना ही माहिती कळवल्यावर गोंदी पोलिसांनी भार्डी येथे धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला आहे. मयत विराज याची आई कावेरी तुकाराम कुढेकर यांनी गोंदी पोलीस ठाण्यात आरोपी ऋषिकेश व त्याची आई रेखा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली असून रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. मयत विराज याचे पार्थिव अंबड उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले होते.
ऑन ड्युटी पोलिसाचा मृत्यू; आई, पत्नीसह लहान लेकराची फरफट; जुनी पेन्शन योजनेमुळे कुटुंबाला मदतीची अपेक्षा