म. टा. प्रतिनिधी, पुणेः शहर जिल्ह्यात १९९८ रुग्णांची नव्याने भर पडल्याने आता जिल्ह्यातील रुग्णसंख्या ९३ हजारापर्यंत पोहोचली आहे. तर शहरात १८२२ रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडल्याने दिलासा मिळाला आहे. तर शहर जिल्ह्यात ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ४२ हजार १८७ एवढ्या चाचण्या झाल्या आहेत. तर पुणे ग्रामीणमध्ये २८ हजार ४६४ चाचण्या झाल्या आहेत. तर जिल्ह्यात आतापर्यंत ६३ हजार ९३० रुग्णांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हयात दिलासा मिळाला आहे. तर जिल्ह्यात आजमितीला २६ हजार ७९१ रुग्ण हे सक्रिय आहेत.

पुणे शहरात अँटीजेन चाचण्यांसह आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या ४६०४ एवढी झाली आहे. तर एकूण चाचण्यांची संख्या २ लाख ८६ हजार ४४४ पर्यंत पोहोचली आहे. शहरात ६३३ रुग्ण गंभीर असून त्यामध्ये ३८९ रुग्ण हे व्हेंटिलेटरवर तर २४४ रुग्ण हे अतिदक्षता विभागात आहेत. तर २१८० रुग्ण हे ऑक्सिजनवर आहेत. शहरात १८२२ रुग्ण एका दिवसात बरे झाल्याने बरे झालेल्या रुग्णाची संख्या सुमारे चाळीस हजार पर्यंत पोहोचली आहे. शहरात काल सक्रिय रुग्णांची संख्या १८ हजाराच्या जवळपास होती. सोमवारी मात्र ही संख्या घटल्याचे दिसून आले. एका रात्रीत एक हजार रुग्णांची संख्या घटल्याचे महापालिकेच्या आकडेवारीतून दिसून आले आहे. म्हणजेच सोमवारी शहरातील सक्रिय रुग्णांची संख्याही १६ हजार ९८१ एवढी झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या एका दिवसात वाढल्याने सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली आहे.

वाचाः

दरम्यान, करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुण्यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी)आणि पिंपरी चिंचवडमध्ये अण्णासाहेब मगर स्टेडिअम येथे जंबो सेंटर उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली असून, २० ऑगस्टपर्यंत ही सेंटर तयार होणार आहेत. एका सेंटरसाठी सुमारे ७० ते ८० कोटी रुपये खर्च येणार आहे. रुग्णांवर उपचार करण्यासाठी खाटांची कमतरता असल्याने मुंबईच्या धर्तीवर पुण्यात जंबो सेंटर उभारण्यात येणार आहेत. या सेंटरच्या ठिकाणाची महापौर मुरलीधर मोहोळ आणि विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी भेट देऊन पाहणी केली. या सेंटरच्या कामाबाबत राव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

वाचाः

‘या जंबो सेंटरमध्ये ६०० ऑक्सिजनयुक्त खाटा आणि २०० आसीयू खाटा असणार आहेत. ऑक्सिजनयुक्त खाटांच्या ठिकाणी वातानुकुलित यंत्रणा करण्याचे यापूर्वी ठरविण्यात आले नव्हते. मात्र, कंपन्यांशी चर्चा करून ही व्यवस्था करण्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी सेवेचा दर्जा चांगला असणार आहे’ असे राव यांनी स्पष्ट केले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here