सातारा : ‘आम्हाला नावे ठेवा; पण तुम्ही सातारावासीयांसाठी काय केलं ते सांगा. मी गेल्या अनेक वर्षांपासून सांगत आहे, तुम्ही एकदा समोरासमोर या. अगदी वेळ, वार, ठिकाणही तुम्हीच ठरवा. एकाने जरी सांगितलं की उदयनराजेंनी भ्रष्टाचार केलाय, तर मी देवाची शप्पथ सांगतो, मिशाच काय भुवया देखील काढून टाकेन. पुन्हा आपलं तोंड दाखविणार नाही. लोकांची सेवा करण्याचा जो वसा आम्हाला मिळालाय तो आम्ही जपत आहे. उलट तुमच्याकडून घराण्याला अशोभनीय कार्य घडत आहे’, अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर केली.सातारा विकास आघाडीच्या वतीने गुरुवारी सायंकाळी विविध विकासकामांचे उद्घाटन खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर जोरदार टीका केला.

‘ज्यांची बौद्धिक पात्रता खुजी आहे, त्यांच्याकडून अपेक्षा काय करणार. त्यांच्याकडे टीका करण्यापलिकडे काहीच उरलेलं नाही. पालकमंत्री, आमदारकी, नगरपालिका व अन्य संस्था अनेक वर्षे तुमच्या ताब्यात असताना विकासकामे का झाली नाहीत? तुम्हाला कोणी अडवलं होतं की तुमची इच्छाशक्ती नव्हती. मी तर म्हणेन तुमच्याच काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला, त्यामुळे कामे रखडली’, असा आरोप उदयनराजे भोसले यांनी केला.

वादात अडकलेलं उदयनराजे भोसलेंचं ते पेंटिंग अखेर पूर्ण होणार; इमारतीवर राजेंचं ऐटदार चित्र

‘तुम्हाला जनमत अजमावयाचं आहे, तर सातारा काय महाराष्ट्रात चला. यांना लोकांसाठी झिजनं काय असतं, हे माहीत आहे का? तुम्ही जर महान कार्य केलं तर निवडणुकीत सर्वसामान्य माणसापुढे का टीकू शकला नाही. लोकांचं हित हाच माझा स्वार्थ आहे. दुसऱ्याला कमी लेखून माणूस कधी मोठा होत नसतो. तो स्वत:च्या कर्तृत्वाने मोठा होतो. मला काय स्वत:चं पेंटिंग काढण्याची हौस नाही. लोक का पेंटिंग काढतायत याचा कधी विचार केलाय का?’ असा सवाल उदयनराजे यांनी केला.

RTOला घाबरून पठ्ठ्याने सुसाट कार थेट गल्लीबोळात घातली, तरी अधिकाऱ्यांना घावला, असा दंड बसला की…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here