शिवसेनेचा माजी जिल्हा संपर्कप्रमुख व ठाण्याचा माजी नगरसेवक मदन नारायण कदम (वय ५७)असं आरोपीचं नाव आहे. त्याची पत्नी नीता (वय ४५), मुलगा योगेश (वय २५), गौरव (वय २२, सर्व रा. शिकवाडी, ता. पाटण) अशा चौघांनी पोलिसांनी अटक केली आहे. कारण, त्यांनी केलेल्या गुन्ह्यांचा पाढा वाचला तर तुमच्या पायाखालची जमिन सरकेल.

पोलीस जेव्हा गोळीबार झाला त्या घटनास्थळी गेले तेव्हा तिथे मदन कदम हा हातात बंदूक घेऊन उभा होता तर त्याच्यासमोर दोघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. भांडणाचा जाब विचारण्यासाठी आलेल्या चौघांवर मदन याने गोळ्या झाडल्या. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले. या गोळीबारात धावडे कोरडेवाडी येथील श्रीरंग लक्ष्मण जाधव (वय ४८), सतीश बाळू सावंत (वय ३५) या दोघांचा मृत्यू झाला. जखमी असलेल्या प्रकाश लक्ष्मण जाधव (वय ४४) यांच्यावर कन्हाडच्या कृष्णा रुग्णालयात उपचार केले.
मदन कदम हा त्याच्या कुटुंबासोबत शिदुकवाडी इथं राहायला होता. गेल्या काही दिवसांआधी त्याचा धावडे कोरडेवाडी इथं राहणाऱ्या सखाराम जाधव यांच्यासोबत वाद झाला होता. गाडीची धूळ उडल्यामुळे सुरू झालेला हा वाद थेट दोघांच्या मृत्यूपर्यंत येऊन पोहोचला. अगदी सिनेमात दाखवतात त्याप्रमाणे कदम याने गोळ्या झाडल्या. त्याच्यामध्ये त्याच्या बायकोनेही त्याला साथ दिली आणि घरातच रंगला रक्तरंजित खेळ.
नेमकं काय घडलं….
झालेल्या शुल्लक वादाचा जाब विचारण्यासाठी प्रकाश जाधव, श्रीरंग जाधव, सतीश सावंत यांच्यासह आणखी काहीजण मदन कदमच्या घरी पोहोचले. त्यावेळी मदनसह त्याची पत्नी आणि दोन मुलं घरातच होती. तुम्ही शिवीगाळ का केली? असा जाब श्रीरंग जाधव यांनी विचारला असता मदन आणखी संतापला. त्याने पुन्हा शांततेत बोलण्याऐवजी थेट उलट शिवीगाळ सुरू केली. यावेळी त्याच्या दोन्ही मुलांनी योगेश आणि गौरव यांनी वडिलांना साथ देण्यासाठी थेट धक्काबुक्की करण्यास सुरू केली.
यामुळे सगळेजण घाबरले आणि तेथून बाहेर जाण्यासाठी निघाले. पण, तोपर्यंत मात्र मदनच्या रागाचा पारा चढला होता. त्याने मोठ्या आरडाओरड करत माझी बंदूक आण यांना गोळ्याच घालतो, अशी ऑर्डर सोडली. त्याच्या बायकोने क्षणाचाही विलंब न करता नवऱ्याच्या हातात बंदू दिली आणि क्षणात बंदुकीतून सुटलेल्या गोळ्या लागून दोघं जमिनीवर कोसळली. इतका रक्तपात करूनही मदन आणि त्याची मुलं थांबली नाहीत. तर त्यांनी बंदूक नाचवत, ‘पुढे या…गोळ्याच घालतो’, असं म्हणत इतरांना धमकावलं.

मदन कदम याने बंदुकीतून गोळ्या झाडल्या ज्यामध्ये श्रीरंग जाधव आणि सतीश सावंत जागीच ठार झाले. यावेळी त्याच्या मुलांनी केलेल्या मारहाणीत प्रकाश जाधव गंभीर जखमी झाले. गोळीबार झाल्यानंतरही मदन हा हातात बंदूक घेऊन त्याचठिकाणी उभा होता आणि पुढे या गोळ्याच घालतो असं बोलत राहिला. कदमने झाडलेली पहिली गोळी श्रीरंग जाधव यांना लागली. क्षणात ते रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळले. त्यानंतर कदमने प्रकाश जाधव यांच्यावर बंदुक रोखली. पण मोठ्या हुशारीने, प्रकाश जाधव हे कदमच्याच मुलाच्या आडोशाला गेले. त्यामुळे मदन थांबला आणि त्याने गोळी झाडली नाही. यानंतर त्याने बंदुक सतीश सावंत यांच्यावर रोखली आणि चाप ओढला. सावंत यांनी गोळी लागताच ते जमिनीवर कोसळले.
दोघांचा खून केल्यानंतर मदन, योगेश व गौरव यांनी मिळून प्रकाश जाधव यांना मारहाण केली. त्यामध्ये ते जखमी झाले. दिसेल त्याच्यावर बेछूट गोळीबार करणाऱ्या मदन कदमच्या घरी जेव्हा पोलीस पोहोचले त्यावेळीही त्याच्या हातात बंदूक होती.
किरकोळ वाद खूनापर्यंत पोहोचला….
किरकोळ कारणावरून आरोपींनी गोळीबार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या गुन्ह्यातील चारही आरोपींना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.
कशी वाढली मदनची दहशत…
ठाण्याचा माजी नगरसेवक असलेला मदन कदम ६ ते ७ वर्षांआधी कुटुंबासह मोरणा खोऱ्यात राहण्यास आला. या खोऱ्यामध्ये कवडीमोल दरात जमीन घेऊन त्याने ती सोन्याच्या भावाने विकली. जमिनीच्या या व्यवहारांमध्ये तो पुरता रंगला आणि इतका पुढे गेला की त्याने शहरात आपली दहशत निर्माण केली. इतकंच नाहीतर ५ ते ६ दिवसांआधीच त्याचा आणि त्याच्या मुलांचा कोरडेवाडीतील सखाराम जाधव यांच्याशी वाद झाला. गाडीची धूळ उडाल्याच्या कारणावरून ही वादाची ठिणगी पडली.
खरंतर, मदन कदमने थेट गोळीबार करावा एवढाही मोठा वाद त्यांच्यात झाला नव्हता. धूळ अंगावर उडाल्याच्या किरकोळ ना कारणावरून एक वादाची ठिणगी पडली आणि या ठिणगीतूनच हा रक्तपात घडला. अगदी सिनेमासारख्या झालेल्या या घटनेनंतर कोरडेवाडीत कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. शिकवाडी इथं आरोपीच्या घराभोवतीही पोलीस तैनात करण्यात आले होते.
लॉंग मार्चमध्ये शेतकऱ्याचा अखेरचा श्वास; कुटुंबियांचे अश्रू अनावर, गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त