नवी दिल्ली: सप्टेंबर २०२३ मध्ये होणारी आशिया चषक स्पर्धा पाकिस्तानमध्येच खेळवली जाणार आहे, हे आता निश्चित झाले आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, स्पर्धेतील बहुतांश सामने पाकिस्तानमध्ये होणार आहेत. मात्र, भारतीय संघाचे सर्व सामने यूएई, ओमान किंवा श्रीलंका यापैकी कोणत्याही एका देशात खेळवण्यात येतील. या स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामने ३ वेळा होणे अपेक्षित असल्याचे समोर येत आहे. यावेळी आशिया कप सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. १३ दिवस चालणाऱ्या ६ संघांच्या स्पर्धेत अंतिम सामन्यासह एकूण १३ सामने होतील. भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. पात्रता फेरी झाल्यानंतर एक संघ त्यांच्यासोबत जाईल. तर श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान दुसऱ्या गटात आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर गावस्कर हे काय बोलून गेले; आता IPL सुरू होईल आणि तुम्ही…
भारताचे सामने पाकिस्तानात खेळवले जाणार नाही

आशिया चषकाच्या प्राथमिक टप्प्यात भारतीय संघ २ सामने खेळणार आहे. एक सामना जिंकल्यानंतर संघ सुपर फोर टप्प्यात पोहोचेल, जिथे त्यांना ३ सामने खेळावे लागतील. जर टीम इंडिया अंतिम सामन्यात पोहोचली तर संघ या स्पर्धेत एकूण ६ सामने खेळेल. भारत अंतिम फेरीत पोहोचल्यास तो सामनाही तटस्थ ठिकाणी खेळवण्यात येईल.

युएई, ओमान आणि श्रीलंका व्यतिरिक्त, तटस्थ ठिकाणांमध्ये इंग्लंडचे नाव देखील आहे, कारण इंग्लंडमध्ये भारत-पाक सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक पोहोचू शकतात. पण इंग्लंडला यजमानपद मिळण्याची आशा फारशी कमी आहे, कारण आशिया चषक आणि आयपीएलचे सामने सप्टेंबरमध्ये यूएई आणि ओमानमध्ये आयोजित केले गेले होते. अशा स्थितीत आशिया खंडातील देशातच भारताचे सामने होणे अपेक्षित आहे.

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवात विराट कोहलीने रचला विक्रम; दिग्गज कर्णधाराला टाकले मागे
एसीसीच्या बैठकीत निर्णय नाही

गेल्या आठवड्यात आशिया चषक पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यासाठी आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) बैठक घेतली. या बैठकीत अंतिम ठिकाण निश्चित होऊ शकले नाही. या बैठकीनंतरही पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) आणि एसीसी सदस्यांमध्ये अनौपचारिक बैठक झाली. या बैठकांमध्ये प्रश्न सोडवण्यात आला. वृत्तानुसार, आशिया चषक स्पर्धेतील भारत वगळता उर्वरित ५ देशांचे सामने पाकिस्तानमध्येच होणार आहेत.

अयोध्येतील काकांचे क्रिकेट प्रेम, कुटुंबाला व्हिडिओ कॉलवर दाखवली भारतीय संघाची नेट प्रॅक्टीस

भारत-पाकिस्तान सामने

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या या स्पर्धेत एकूण ६ संघ सहभागी होणार आहेत. भारतीय संघाच्या गटात पाकिस्तानशिवाय एक संघ पात्रता फेरीतून पोहोचेल. श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान दुसऱ्या गटात असतील. दोन्ही गटातील टॉप-२ संघ सुपर-फोर टप्प्यात पोहोचतील.

भारत आणि पाकिस्तान सुपर फोर टप्प्यात पोहोचल्यास, दोन्ही संघ पुन्हा एकदा एकमेकांशी भिडतील. सुपर फोर टप्प्यातील टॉप-२ संघ अंतिम फेरीत पोहोचतील. जर फक्त भारत आणि पाकिस्तानने टॉप-२ मध्ये स्थान मिळवले तर दोन्ही संघ अंतिम फेरीतही आमनेसामने येतील. अशा प्रकारे दोन्ही संघ स्पर्धेत ३ वेळा भिडतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here