नवी दिल्ली : अमेरिकेची शॉर्ट सेलर कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चने पुन्हा एकदा आपल्या अहवालाने खळबदल उडवली आहे. भारतीय अब्जाधीश गौतम अदानी यांच्यानंतर हिंडेनबर्गने अमेरिकन पेमेंट कंपनी ब्लॉक इंकला लक्ष्य केले आहे. हिंडेनबर्गने गुरुवारी ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डोर्सीच्या ब्लॉक इंक कंपनीवर मोठा आरोप करत आपला अहवाल प्रकाशित केला. हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर कॉर्पोरेट क्षेत्रात पुन्हा खळबळ उडाली आणि ब्लॉकचे शेअर्स २०% कोसळले. विशेष म्हणजे २०२३ च्या सुरुवातीला भारतीय अब्जाधीश गौतम अदानी यांना लक्ष्य केल्यानंतर हिंडेनबर्गने आणखी एका भारतीयावर गंभीर आरोप केले आहेत.

हिंडेनबर्गने आपल्या अहवालात अमृता आहुजा यांचा वारंवार उल्लेख केला आहे. चला जाणून घेऊया कोण आहे अमृता आणि तिचा ब्लॉक इंकशी काय संबंध आहे?

कोण आहेत जॅक डोर्सी? हिंडेनबर्गच्या जाळण्यात नवीन ‘मासा’, एका अहवालाने ८० हजार कोटी बुडाले
कोण आहे अमृता आहुजा?
भारतीय वंशाच्या अमृता आहुजा ब्लॉक इंकच्या मुख्य वित्तीय अधिकारी म्हणजेच CFO पदावर कामकाज सांभाळतात. अमृतावर ब्लॉक इन्सचे शेअर्स डंप केल्याचा आरोप आहे. तर अहुजा २०१९ मध्ये कंपनीत पदावर रुजू झाली आणि २०२१ मध्ये त्यांना ब्लॉक इंकचे सीएफओ पदावर बढती मिळाली. द वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, अमृता यांचे पालक भारतीय प्रवासी असून ते क्लीव्हलँडमध्ये डे-केअर सेंटर चालवतात. व्यावसायिक मार्गावर अमृता Airbnb, मॅकिन्से अँड कंपनी, द वॉल्ट डिस्ने, फॉक्स यासारख्या मोठ्या कंपन्यांसोबत काम केले असून कॉल ऑफ ड्यूटी, कँडी क्रश, वर्ल्ड ऑफ वॉरक्राफ्ट यासारखे गेम तयार करण्यासाठी त्यांनी व्हिडिओ गेम निर्माता ऍक्टीव्हिजन ब्लिझार्डसोबत काम केले.

मोदींच्या भाषणावर राहुल गांधी म्हणाले, मोदी अदानींना संरक्षण द्यायचा प्रयत्न करतायंत

दरम्यान, हिंडेनबर्गच्या अहवालात भारतीय वंशाच्या अमृता आहुजाच्या नावाचा वारंवार उल्लेख करण्यात आलं असून ब्लॉकच्या शेअर्समध्ये फेरफार केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. अहवालात अमृतावर ब्लॉक इंकचे शेअर्स डंप केल्याचा आरोप करण्यात आला असून, ब्लॉक इंक कंपनीच्या सीएफओ अमृताने करोना काळात लाखो डॉलर्स स्टॉकमध्ये गुंतवले, असे सांगण्यात आले आहे. मात्र हिंडेनबर्गने फक्त अमृताच नाही तर कंपनीच्या इतर अनेक अधिकाऱ्यांवर स्टॉक डंपिंगचा आरोप केला आहे.

अदानींना दणका दिल्यानंतर हिंडेनबर्गचा नवा अहवाल आला, अब्जावधीची उलाढाल असलेल्या कंपनीचे शेअर्स गडगडले
ब्लॉक इंकसोबत रुजू झाली
२००१ मध्ये अमृताने मॉर्गन स्टॅनलीसोबत बँकर म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि २०१९ मध्ये ब्लॉक इंकमध्ये रुजू झाली. अवघ्या दोन वर्षांत म्हणजे २०२१ मध्ये तिला कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी बनवण्यात आले. एका कंपनीतील सीएफओ व्यक्ती कंपनीतील सर्वात वरिष्ठ वित्त व्यावसायिक असून व्यवसायाच्या आर्थिक आरोग्यासाठी जबाबदार असते.

ब्लॉक इंक कंपनीबाबत सविस्तर तपशील
ब्लॉक इंक एक फायनान्शियल ॲप आधारित प्लॅटफॉर्म असून यासाठी वापरकर्ता क्रेडिट-डेबिट कार्डद्वारे पेमेंट पाठवू आणि प्राप्त करू शकतो. पूर्वी कंपनीचे नाव स्क्वेअर इंक होते, नंतर २०२१ मध्ये त्याचे नाव बदलून ब्लॉक इंक असे करण्यात आले. कंपनी न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध असून कंपनीचा मासिक सक्रिय वापरकर्ता ५१ दशलक्ष आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here