aurangabad news today marathi, पहाटे अंघोळीला गेली अन्…; ३ दिवसावर लग्न, अंगाला हळद लागणार तोच नवऱ्या मुलीचा दुर्देवी अंत – unfortunate death of a young woman bride due to shock the day before of haldi chhatrapati sambhaji nagar aurangabad news
छत्रपती संभाजीनगर : कधी, कोणाचा आणि कसा मृत्यू होईल याचा काही नेम नाही. अशीच एक घटना छत्रपती संभाजीनगर इथं समोर आली आहे. इथं तीन दिवसानं लग्न, पत्रिका वाटल्या, बस्ता बांधला, पाहुणे आणि लग्नाची लगबग सुरू असतानाच १८ वर्षीय भावी वधूचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला असून नवऱ्या मुलाच्या घरीदेखील शोककळा पसरली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, नवरी मुलगी अंघोळीला गेली असताना पाणी घेताना हिटरचा शॉक लागून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे लग्न घरात नवरदेवाची वरात येण्याऐवजी भावी नवरीची अंत्ययात्रा निघाल्याने अख्ख्या गावाने हळहळ व्यक्त केली आहे. ही मन हेलावून टाकणारी घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालूक्यात असलेल्या वांगी खुर्द या गावात घडली. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रोहिणी उर्फ पल्लवी भगवान जाधव वय -१८ (रा. वांगी खुर्द, ता.सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) असे मृत तरुणीचे नाव आहे. वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेलेल्या पतीची गर्भवती पत्नी पाहत होती वाट, तेवढ्यात आला रावसाहेब दानवेंचा फोन कॉल… या दुर्दैवी घटनेप्रकरणी सरपंच कोंडीबा शेळके यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, रोहिणीचा साखरपुडा झालेला होता. २६ मार्च रोजी म्हणजेच तीन दिवसानंतर तिचे लग्न होते. लग्नाच्या पत्रिका पाहुण्यांना वाटून झाल्या होत्या. शिवाय लग्नाचा बस्ता, मंडप, वाजंत्री जेवणाची व्यवस्था पूर्ण झाली होती. जवळचे पाहुने घरी येण्यास सुरुवात झाली होती.