म. टा. प्रतिनिधी, पुणेः देशातून क्षयरोगाचे (टीबी) २०२५ पर्यंत निर्मुलन व्हावे म्हणून सरकार प्रयत्न करत असतानांच गेल्या काही वर्षांमध्ये ‘औषधांना दाद न देणारा क्षयरोग’ (मल्टिपल ड्रग रेझिस्टन्स,) या प्रकारच्या क्षयरोगाचे रुग्ण वाढत आहे. या प्रकारचा क्षयरोग झालेल्या रुग्णांना औषधे लागू पडत नाही. परिणामी यातून बरे होण्यासाठी जास्त कालावधी लागतो.
उपचार अर्धवट सोडून देणे, वेळेवर योग्य औषधं न मिळणे या कारणांमुळे औषधांना दाद न देणारा क्षयरोग वाढत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले आहे.

क्षयरोग हा संसर्गजन्य आजार आहे. खोकल्यावाटे तोंडातील जंतूंचा हवेद्वारे संसर्ग होऊन क्षयरोग होण्याची शक्यता असते. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने क्षयरोगाचे जंतू हवेत तरंगतात. सुमारे ५ ते ७ दिवस हवेत तरंगत राहतात. त्या दरम्यान हे जंतू हवेतून श्वासाद्वारे फुफ्फुसात जाण्याची शक्यता अधिक असते. या प्रकारे क्षयरोग होण्याची शक्यता दाट असते. करोना हा संसर्गजन्य आहे, मात्र संसर्गजन्य आजार रोखण्याची ज्या प्रकारे काळजी घ्यावी लागते, त्या प्रमाणे क्षयरोग रोखण्यासाठी काळजी घेतली जात नाही, याची खंत जागतिक क्षयरोग दिनानिमित्त वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली.

१८ वर्षांचा मुलगा क्रूर झाला, सावत्र भावाला नाका-तोंडात चिखल कोंबून संपवले; कारण आहे भयंकर
क्षयरोग हा एका व्यक्तीपासून ४० किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना होण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्यांना क्षयरोग झालेल्या रुग्णांनी काळजी घेणे आवश्यक आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार जानेवारी २०२३ पर्यंत राज्यात १ लाख ५४ हजार १४७ क्षयरोगाचे रुग्ण आहेत. क्षयरोग हा फक्त फुफ्फुसांनाच होतो असे नाही, तर हृदय, मेंदू, जठर, गर्भाशय या अवयवांना देखील क्षयरोग होण्याची शक्यता असते. क्षयरोगाच्या निर्मुलनासाठी प्रयत्न होत असातना प्रत्यक्षात मात्र, या आजाराबाबत जागृती नसल्याचे दिसून येते.

प्रियकरासोबत ‘त्या’ ठिकाणी फिरायला जाण्याची चूक झाली; तरुणीवर दोघांनी केले भयानक अत्याचार
हा संसर्गजन्य असल्याने घरातील एका व्यक्तीला संसर्ग झाला तर सर्वांनी तापसणी करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सर्वाजनिक थुंकणाऱ्यांची संख्या जास्त आहे. यामुळे देखील या आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता असते. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, अशा नागरिकांची तपासणी करणे आवश्यक असते. त्याचबरोबर सर्वाजनिक ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या तपासण्या करणे आवश्यक आहे. क्षयरोग निर्मुलनाची मोहिम फक्त सरकारपूर्ती मर्यादीत न राहता नागरिकांनी या मोहित सहभागी होणे आवश्यक आहे, याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले.

लक्षणे

– श्वास घेण्यास त्रास होणे.
– भूक न लागणे.
– वजन कमी होणे.
– थकवा जाणवणे.
– ताप येणे.
– दोन आठवडे किंवा त्‍यापेक्षा जास्‍त कालावधीचा खोकला.
– खोकताना थुंकीवाटे रक्‍त पडणे.

‘औषधांना दाद न देणारा क्षयरोग’ गेल्या काही वर्षात वाढत आहे. क्षयरोग निर्मुलन करणे ही फक्त सरकारची जबाबदारी आहे, असे नाही. सर्वांनी या मोहिमेत सहभागी होणे आवश्यक आहे. नख आणि केसांना सोडून शरीरातील सर्व अवयवांना क्षयरोग होण्याची शक्यता असते. हा संसर्गजन्य आजार असून देखील या बाबत जागृतीचा अभाव आहे’.

– डॉ. सयंज गायकवाड, झोनल टास्क फोर्स अध्यक्ष (एनटीईपी वेस्ट झोन)

‘निदान झाल्यावर त्वरीत औषधे घेतल्यास क्षयरोग बरा होतो. मात्र, उपचार अर्धवट सोडून दिल्यास ‘औषधांना दाद न देणारा क्षयरोग होण्याची शक्यता असते. या प्रकारचा क्षयरोग झाला तर औषधे काम करीत नाही. पहिल्यांदा कधीच क्षयरोग झाला नाही अशांना थेट औषधांना दाद न देणारा क्षयरोग होत असल्याचे काही रुग्ण आढळून आले आहेत’.

– डॉ. स्नेहा तिरपुडे, श्वसनरोग तज्ज्ञ, रुबी हॉल क्लिनिक

Facts And Myths Of Cancer | कॅन्सर बरा होतो की नाही? या व्हिडिओत मिळेल तुम्हाला उत्तर || Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here