Nashik Crime : नाशिक शहरात (Nashik)  पुन्हा एकदा खुनाची घटना घडली असून पाथर्डी फाटा नजीक असलेल्या पांडवलेणी परिसरात हा प्रकार घडला आहे. रात्रीच्या सुमारास अज्ञात संशयितांनी कंपनी व्यवस्थापकावर धारदार शस्त्राने वार करत रस्त्यावर फेकून दिले. त्यानंतर नाशिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. मात्र या घटनेने नाशिक शहर हादरले आहे. 

नाशिक शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी (Crime) कळस गाठत असून कौटुंबिक वाद, कधी पूर्ववैमनस्यातून वाद, भाईगिरीतून वाद अशांमुळे सामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. सातत्याने होणाऱ्या घटनामुळे पोलिसांचा वचकच कमी झाल्याचे चित्र आहे. अशातच मुंबई नाशिक महामार्गावरील (Mumbai Nashik Highway) पाथर्डी फाटाजवळ कंपनी मॅनेजरवर प्राणघातक हल्ला करत त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाथर्डी फाटा नजीक असलेल्या पांडव लेणीच्या (Pandev Leni) पायथ्याशी असलेल्या हॉटेल आंगणजवळ नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. कंपनीत मॅनेजर असलेल्या योगेश मोगरे यांची चारचाकी कार अडवून अज्ञात गुंडांनी त्यांच्यावर धारधार हत्यारांनी वार करून गंभीर जखमी केले होते. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी मॅनेजर असलेले योगेश मोगरे (Yogesh Mogre) हे आपले काम उरकून घरी निघाले होते. गरवारे येथील सर्विस रोडवरून पाथर्डी फाट्याकडे चारचाकी कारने जात होते. यावेळी हॉटेल आंगण समोर अज्ञात दोन संशयितांनी त्यांची गाडी अडवून थांबवले. यावेळी संशयितानी लपविलेले धारदार कोयते, हत्यारे काढून मोगरे यांच्या अंगावर, पाठीवर तसेच मानेवर सपासप वार केले. या हल्ल्यात योगेश मोगरे हे गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले. यावेळी या रस्त्यावरून जात असलेल्या रिक्षा चालकाने मोगरे यांना रिक्षात बसवून नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र आज सकाळी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. 

दरम्यान, योगेश मोगरे यांच्यावर हल्ला केल्यानंतर हल्लेखोरांनी मॅनेजरची चारचाकी कार पळवून नेली आहे. त्यांनतर मोगरे यांना एका रिक्षा वाल्याने तातडीने उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान आज सकाळी मॅनेजर योगेश मोगरे यांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त प्रशांत बच्छाव साहेब आयुक्त सोहेल शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांबळे यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पहाणी करत हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. या घटनेबाबत रात्री इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

news reels reels

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here