नवी दिल्ली : डिजिटल युगात पैसे पाठवण्याचे कामही ऑनलाइन केले जात आहे. UPI हा ऑनलाइन पैसे पाठवण्याचा सर्वात सोपा आणि जलद मार्ग आहे. याशिवाय आणखी तीन मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही ऑनलाइन पैसे पाठवू शकता. हे तीन पर्याय म्हणजे RTGS, NEFT आणि IMPS या तिन्ही पद्धती पैसे हस्तांतरित करण्यासाठी वापरल्या जातात. मात्र या तीन पद्धतींमध्ये काय फरक आहे, आता हे जाणून घेऊया. Google वर कस्टमर केअर नंबर शोधाल अन् पुरते फसाल; ५ हजार लोकांसोबत काय घडलं, वाचाच…
आरटीजीएस म्हणजे काय?
आरटीजीएसचे पूर्ण रूप म्हणजे रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. याद्वारे आपण सहजपणे मोठ्या प्रमाणात रक्कम किंवा निधी ऑनलाइन हस्तांतरित करू शकता. UPI मधील व्यवहार आणि मूल्याच्या मर्यादेमुळे मोठी रक्कम हस्तांतरित शक्य नाही. आरटीजीएसद्वारे तुम्ही दोन लाख रुपयांहून अधिक ऑनलाइन ट्रान्सफर करू शकता. या प्रक्रियेत रिअल टाइम आधारावर पैसे हस्तांतरित केले जातात. आठवड्याचे सातही दिवस २४ तास सुरू असते. या एसबीआयच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार सेवेचा लाभ बँकेच्या शाखेमार्फत घेतला तर तुम्हाला नाममात्र शुल्क लागू शकते. आणि ऑनलाइन प्रक्रिया केली तर त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

Retirement Planning: निवृत्तीनंतर माझ्याकडे किती पैसे असायला हवेत? असा लावा हिशेब…
NEFT म्हणजे काय?
एनईएफटी देखील ऑनलाइन पैसे पाठवण्याचा एक मार्ग आहे. याद्वारे तुम्ही देशात कुठेही पैसे पाठवू शकता. तसेच NEFT ला पैसे पाठवण्यासाठी कमाल आणि किमान रक्कम निश्चित केलेली नाही. या एसबीआयच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार सेवेचा लाभ बँकेच्या शाखेमार्फत घेतला तर तुम्हाला नाममात्र शुल्क लागू शकते. आणि ऑनलाइन प्रक्रिया केली तर त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. NEFT दिवसाचे २४ तास आठवड्याचे सातही दिवस वापरता येते. याशिवाय तुम्ही या सुविधेसह क्रेडिट कार्ड बिल, कर्ज भरणे आणि परकीय चलनाचे व्यवहारही करू शकता.

CIBIL Score: सिबिल स्कोअर खराब असला तरी तुम्हाला मिळेल कर्ज, जाणून घ्या कसं
IMPS म्हणजे काय?
IMPS चे म्हणजे तात्काळ पेमेंट सेवा. या सुविधेत तुम्ही ताबडतोब एखाद्याला पैसे ट्रान्सफर करू शकता. हे तुम्हाला कधीही पैसे ट्रान्सफर करण्याची सेवा देते. तुम्ही सुट्टीच्या दिवशीही याद्वारे पैसे ट्रान्सफर करू शकता. या सुविधेत जास्तीत जास्त आणि कमीत कमी पैसे पाठवण्यासाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here