आग्राः पाळीव प्राणी-पक्षीदेखील आपल्या घरातील एक प्रकारचे सदस्यच असतात. घरावर एखादं संकट आले की सगळ्यात आधी पाळीव प्राणी आपल्या जीवाची बाजी लावून लढतात. पाळीव प्राण्यांची स्मरणशक्तीदेखील चांगली असते. एखाद्या व्यक्तीचा चेहरा असो वा आवाज ते सहसा विसरत नाहीत. एका पोपटामुळं एका महिलेच्या हत्येचं गूढ उकलल्याचा प्रकार समोर आला आहे. पोपटाने दिलेल्या पुराव्यामुळं पोलिसांना आरोपींना पकडणे सहज शक्य झाले आहे. तर कोर्टानेही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. महिलेच्या हत्येनंतर ६ महिन्यातच पोपटाचाही मृत्यू झाला होता. मात्र, जाता-जाता त्याने त्याच्या मालकीणीला न्याय मिळवून दिला. २० फेब्रुवारी २०१४ रोजी आग्रा इथे राहणारे विजय शर्मा मुलगा आणि मुलीसोबत फिरोजाबाद येथे एका लग्नासाठी गेले होते. त्याचवेळी घरात त्यांची पत्नी आणि नीलम आणि वडिल आनंद शर्मा हे दोघच होते. घरी परतल्यानंतर त्यांना पत्नी नीलम रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. तसंच, घरातून मोठी रक्कमही गायब असल्याचं त्यांना कळलं. पत्नीची हत्या धारदार शस्त्राने करण्यात आली होती. मात्र, चार दिवसांतच पोलिसांनी आरोपी आशू उर्फ आशुतोष गोस्वामीला पकडण्यात यश आलं. आशुविषयी माहिती शर्मा यांच्या घरातील पाळीव पोपटाने दिली होती. पोलिसांनीही त्यांच्या तपासात या पोपटाचे नाव घेतलं होतं.

१८ वर्षांचा मुलगा क्रूर झाला, सावत्र भावाला नाका-तोंडात चिखल कोंबून संपवले; कारण आहे भयंकर
महिलेच्या हत्येनंतर त्यांचा पाळीव पोपट हिरा नेहमीच शांत शांत राहायचा. हिरा आणि नीलम शर्मा हे दोघंही तास् नतास एकत्र वेळ घालवत असतं. जेव्हा घरातल्यांचे लक्ष हिराकडे गेले तेव्हा त्यांना थोडा संशय आला. तेव्हा सगळे हिराकडे गेले आणि त्याच्याशी बोलू लागले. नीलम यांचे पती विजय यांनी त्याला नीलमची हत्या कोणी केली व हे सगळं तुझ्यासमोर झालं का?, असा प्रश्न विचारला. तसंच, त्यांच्यावर ज्यांचा संशय होता त्यांची नावं घेण्यास सुरुवात केली. जसं विजय यांच्या भाच्याचे म्हणजेच आशुचं नाव घेतलं तसं हिरा जोरजोरात ओरडायला लागला. त्यानंतर त्यांनी लगेचच याची माहिती पोलिसांना दिली.

प्रियकरासोबत ‘त्या’ ठिकाणी फिरायला जाण्याची चूक झाली; तरुणीवर दोघांनी केले भयानक अत्याचार
पोलिसांनी तात्काळ आशूला अटक करुन त्याची कसून चौकशी केली. त्यानंतर त्याने आपला गुन्हा कबुल केला. आरोपीने त्याच्या मित्रासोबत मिळून हा कट रचला होता. आशु हा त्यांच्या नात्यातीलच होता. त्यामुळं त्याचं घरी येणं-जाणं होतं. त्यामुळं त्याला घरात ठेवलेली रोख-रक्कम आणि दागिने कुठे होते हे माहिती होतं. त्याने त्याच्या एका मित्राच्या मदतीने दरोडा टाकण्याची योजना बनवली. आशूने चाकूने नीलम शर्मा यांच्यावर १४ वार केले तर पाळीव कुत्र्यावर ९ वार केले. त्यावेळी त्यांचा पाळीव पोपट घरातच होता. कोर्टाने गुरुवारी आरोपींना जन्मठेप आणि ७२ हजारांची दंडाची शिक्षा सुनावली आहे.

काय सांगता! शेतकऱ्यानं थाटामाटात केलं आपल्या नऊ महिन्याच्या बोकडाचं बारसं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here