निर्दयी लेकीनेच केले आईचे तुकडे-तुकडे…
आई-मुलीचं नातं म्हटलं की प्रेम आणि जिव्हाळ्याचं असतं. परंतु, मुंबईतील लालबागच्या या मुलीने जे केलं जे कदाचित कोणत्याही मुलीने आपल्या आईसोबत केलं नसेल. २३ वर्षीय रिंपल जैन तिची आई वीणा जैन यांच्यासोबत लालबाग परिसरात राहत होती. तब्बल १६ वर्षांआधी तिच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर आईनेच रिंपलचं पालनपोषण केलं, तिला लहानाचं मोठं करून तिला शिक्षण दिलं. मात्र, याची जराही जाण न ठेवता तिने आईसोबत भयंकर केलं. खरंतर, हत्येच्या काही दिवसांआधी वीणा या बाथरूममध्ये जात असताना पडल्या होत्या. त्याचवेळी त्यांचा मृत्यू झाला. यावेळी रिंपलला मदत करणाऱ्या रेस्टॉरंटच्या व्यक्तीने तिला आईला डॉक्टरकडे नेण्यास सांगितलं पण रिंपलने नकार दिला. आईचा मृत्यू झाल्याने सगळे मलाच दोषी ठरवतील या भीतीने तिने ३ महिन्यांपूर्वी घरातच आईचा मृत्यू लपण्यासाठी भयंकर प्लॅनिंग केलं.

३ महिने घरातच ठेवला आईचा मृतदेह…
आईच्या मृत्यूनंतर या क्रूर मुलीने इलेक्ट्रिक मार्बल कटर, चाकू आणि चॉपरच्या मदतीने आईच्या मृतदेहाचे छोटे छोटे तुकडे केले. तिने सगळ्यात आधी आईचे हात, पाय वेगळे केले. त्यानंतर आईच्या धडाचे अनेक तुकडे केले. यानंतर हे मृतदेहाचे तुकडे प्लास्टिकच्या पिशवीत बांधून कपाटात ठेवले. इतकंच नाहीतर तर आईचे पाय स्टीलच्या पाण्याच्या टाकीत टाकून लपवले. घरात फक्त आई आणि मुलगी राहत असल्याने कोणालाच याची कानोकान खबर लागली नाही.
मृतदेहावर ओतल्या अत्तराच्या १०० बाटल्या…
काही दिवस असेच शांततेट उलटले. पण नंतर आईच्या मृतदेहातून दुर्गंधी येऊ लागली. यामुळे रिंपलने बाजारात जाऊन अनेक परफ्युमच्या बाटल्या विकत घेतल्या. दुर्गंधी येऊ नये म्हणून ती मृतदेहावर परफ्यूम मारायची. तरीही, दोन वेळा शेजाऱ्यांनी रिंपलला तिच्या आईबद्दल विचारलं असता, ती कानपूरला गेल्याचं खोटं तिने शेजाऱ्यांना सांगितलं. हळूहळू मृतदेहाची दुर्गंधी बाहेर पसरू लागली. शेजारच्या घरांनाही दुर्गंधी येत होती, पण या घरात असं काही घडू शकतं याचा कोणालाच अंदाज नव्हता.

रिंपल आणि तिच्या आईचे त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांशी तणावपूर्ण संबंध होते. तसंच त्यांचे त्यांच्या शेजारच्यांशीही संबंध चांगले नव्हते. रिंपलने त्यांच्या घरातील आर्थिक अडचणीमुळे कॉलेजही सोडलं होतं. या दोघीही बेरोजगार होत्या. त्यांना जगण्यासाठी कोणतंही उत्पन्न नव्हतं. दरम्यान, पोलिसांनी रिंपलचा मागील तीन महिन्याचा डेटा तपासला. त्यावेळी तिच्या कॉल लिस्टमध्ये असलेल्या शेवटच्या नंबरचा शोध घेण्यात आला. फोनवरुन शेवटचं रिंपलच्या संपर्कात आलेल्या त्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं एक पथक सध्या यूपीच्या कानपूरमध्ये आहे.
आरोपी मुलीवर मामाला आला संशय…
वीणाचा भाऊ म्हणजेच आरोपी रिंपलचा मामा सुरेश कुमार हा मुंबईत राहायचा. दर महिन्याला घर खर्चासाठी तो बहीण आणि भाचीला पैसे द्यायचा. गेल्या अनेक दिवसांपासून तो जेव्हाही वीणाशी बोलण्यासाठी फोन करायचा तेव्हा रिंपल काही ना काही कारण सांगून त्याला टाळायची. वीणाला त्याची शेवटची भेट गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झाली होती. त्यामुळे अखेर त्याने आपल्या मुलीला वीणा यांच्या घरी जायला सांगितलं.
ऑन ड्युटी पोलिसाचा मृत्यू; आई, पत्नीसह लहान लेकराची फरफट; जुनी पेन्शन योजनेमुळे कुटुंबाला मदतीची अपेक्षा
यावेळी रिंपलच्या मामाची मुलगी पैसे देण्यासाठी रिंपलच्या घरी गेली असता, रिंपलने तिला आत येऊ दिलं नाही. त्यानंतर रिंपलची मावशी आणि भाऊही तिथे गेले पण तिने त्यांनाही आत जाण्यापासून रोखलं. या घटनेनंतर कुटुंबीयांना संशय आला आणि त्यानंतर २ दिवसांपूर्वी रिंपलच्या मामाने बहिण बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. त्याने रिंपलवरही संशय बळावला आणि अखेर या भयंकर घटनेच्या तपासाला सुरुवात झाली.
पोलिसांना ३ महिन्यांनंतर सापडला मृतदेह…
पोलीस मुंबईतील रिंपलच्या घरी पोहोचले. रिंपलने दरवाजा उघडताच त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण, घरातील दुर्गंधी इतकी तीव्र होती की तिथे उभं राहणंही कठीण होतं. घराची झडती घेतली असता घरातून कुजलेला मृतदेह आढळून आला. यानंतर रिंपल वेगवेगळे बहाणे करू लागली. मृतदेह पाहून तिलाही धक्काच बसला. मात्र, पोलिसांनी चौकशी केली असता आईची हत्या मी केली नाही. पण तिच्या मृत्यूनंतर मी तिच्या शरीराचे तुकडे केल्याची कबुली तिने दिली.
प्रियकरामुळे आईची हत्या…
या प्रकरणी अद्याप तपास सुरू आहे. मात्र, या मुलीने प्रियकरामुळेच आपल्या आईची निर्घृण हत्या केल्याची माहिती दिली. खरंतर, रिंपलचे दोन बॉयफ्रेंड होते आणि हे आई वीणाला अजिबात आवडलं नव्हतं. यामुळे अनेकदा आई आणि मुलीमध्ये भांडणं व्हायची. या मुद्द्यावर तिने आईची हत्या केली आणि नंतर मृतदेह लपवण्यासाठी त्याचे तुकडे केले, असंही पोलीस तपासात समोर आलं. इतकंच नाहीतर आई वारंवार टोकायची यामुळे तिला संपवल्याचंही रिंपलने पोलीस तपासात उघड केलं.