बुलढाणाः साडीच्या ऑर्डरसाठी पाच रुपये पाठवले आणि ९९ हजार गमावून बसल्याचा प्रकार एका प्राथमिक शाळेतील शिक्षकासोबत घडला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील एका प्राथमिक शिक्षकाच्या पत्नीने १३०० रुपयाची साडी ऑनलाइन ऑर्डर केली. ऑर्डर आल्यानंतर ती घरी कोणी नसल्याने घेतली गेली नाही. त्यानंतर एक फ्रॉड फोन येऊन लिंक देण्यात आली यावर पाच रुपये भरा म्हणून त्यावर शिक्षकाने पैसे भरले असता खात्यातून ९९ हजारपेक्षा जास्त रक्कम खात्यातून काढण्यात आली.

सायबर पोलीस स्टेशनमध्ये २० मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील डीईएस हायस्कूलमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले अमोल रवींद्र महाजन वय वर्ष ३६ यांच्या पत्नीने १२ फेब्रुवारी रोजी ऑनलाइन पद्धतीने १३०० रुपये किंमतीची साडी ऑर्डर केली. २४ फेब्रुवारी रोजी तक्रारदार महाजन पती-पत्नी घरी नसल्याने आलेली डिलिव्हरी स्वीकारता आली नाही. मात्र, ही संधी सायबर भामट्याने साधून एक मार्च रोजी तक्रारदार शिक्षकाच्या पत्नीस फोन करून तुमची ऑर्डर रखडली आहे ती मिळण्यासाठी पाठवलेल्या लिंकवर पाच रुपये पाठवा असे सांगितले.

पाळीव पोपटाने मिळवून दिला मालकीणीला न्याय, पोलिसांना दिला पुरावा, असा झाला हत्येचा उलगडा
त्यांनी लिंकवर पाच रुपये पाठविले असता सायबर भामट्याने तब्बल तीन वेळा पेमेंट करण्यास सांगितले या प्रकरणी तक्रारदार महाजन यांना संशय येताच त्यांनी चार मार्च रोजी खात्यातील रकमन तपासली असता त्यांच्या खात्यातून ९८ हजार ९९९ आणि दुसऱ्या वेळेला ९९९ रुपये असे ९९,९९८ रुपये एचडीएफसी बँकेच्या खात्यात वळती केली असल्याचे दिसून आले. तेव्हा सायबर भामट्याने शिक्षक अमोल महाजन यांची ९८ हजार ९९८ फसवणूक केली आहे. अशा तक्रारीवरून सायबर पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

१८ वर्षांचा मुलगा क्रूर झाला, सावत्र भावाला नाका-तोंडात चिखल कोंबून संपवले; कारण आहे भयंकर
दुसरीकडे जिल्ह्यात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहे. त्यामुळे जनसामान्यांमध्ये सायबर जागरूकता वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे.

शिक्षक संपामुळे लेकरांचं नुकसान; शेवटी ग्रामस्थच झाले शिक्षक, पद्मश्री पोपटराव पवारांचं स्तुत्य पाऊल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here