मुंबई : गौतम अदानी आणि त्यांच्या बाजारातील गुंतवणूकदारांना जोरदार दणका दिल्यावर आता हिंडेनबर्ग रिसर्चने आपला पुढील शिकार शोधला आहे. आजपासून बरोबर दोन महिन्यापूर्वी म्हणजे २४ जानेवारी रोजी अमेरिकेच्या न्यूयॉर्क-स्थित हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहाबाबत एक खळबळजनक अहवाल प्रकाशित केला होता. तेव्हापासून अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण सुरु झाली आणि स्टॉक्स ७० ते ७५% पेक्षा जास्त कोसळले. या दोन महिन्यांत अदानी समूहाच्या शेअर्समध्ये अक्षरशः तोंडघशी आपटले होते, मात्र आता दोन महिन्याच्या अधिक कालावधीनंतर शेअर्स सावरताना दिसत आहेत. या दोन महिन्यांत अदानी समूहाच्या पोर्ट्स ते पॉवर स्टॉकमध्ये किती वसुली झाली ते जाणून घेऊया.अदानी एंटरप्रायझेस
हिंडेनबर्गच्या अहवालाचा सर्वाधिक परिणाम अदानी समूहाची प्रमुख कंपनी, अदानी एंटरप्रायझेसवर झाला. कंपनीचे शेअर्स 24 जानेवारी रोजी ३,४४१ रुपयांवर क्लोज झाले होता तर हिंडेनबर्गचा अहवाल २४ जानेवारीला आला आणि २७ जानेवारीला बाजार उघडताच शेअर २,७६८.५० रुपयांवर गडगडला. दरम्यान, गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत शेअर आपल्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळी १,०१७.४५ रुपयांवर कोसळला. तर आज हा शेअर सावरला असून सकाळच्या सत्रात १८०८.१५ रुपयांवर व्यवहार करत होता. म्हणजेच, या समभागाने सुमारे ८०० रुपये प्रति शेअर वसूल केले आहेत.

दिग्गज IT कंपनीचा शेअर ३१०० रुपयांवर, खरेदी-विक्री की होल्ड करावं? मार्केट एक्स्पर्ट म्हणतात…
अदानी पोर्ट्स
हिंडेनबर्ग अहवालाच्या पार्श्वभूमीवर ३ फेब्रुवारी २०२३ रोजी अदानी पोर्टने ३९५.१० रुपयांच्या ५२ आठवड्यांचा नीचांक गाठला होता. २४ जानेवारी २०२३ रोजी शेअर ७५९ रुपयांवर बंद झाला आणि २७ तारखेला बाजार उघडताच अदानी समूहाच्या इतर समभागांप्रमाणे ६०४ रुपयांवर घसरला. आज, अहवालाच्या तब्बल दोन महिन्यांनी सकाळच्या सत्रात शेअर ६५८.८० रुपयांवर व्यवहार करत असून आपल्या ५२ आठवड्यांच्या नीचांकीच्या २६० रुपये वर व्यवहार करत आहे.

२०१४ ला अदानी ६०९ क्रमांकावर होते, मग जादू झाली, दुसऱ्या क्रमांकावर कसे पोहोचले? : राहुल गांधी

अदानी ग्रीन एनर्जी
२४ जानेवारीला भारतीय शेअर बाजार बंद झाल्यानंतर हिंडेनबर्गचा अहवाल प्रकाशित करण्यात आला होता. त्यावेळी अदानी ग्रीन एनर्जी १,९१०.४५ रुपयांवर क्लोज झाला तर २७ जानेवारी रोजी बाजारात आलेल्या भूकंपात अदानी ग्रीनच्या गुंतवणूकदारांचे चेहरे फिके पडले. शेअर १,४८६.२५ रुपयांवर आपटला. घसरणीच्या वादळात शेअर ४३९.१० रुपयांच्या नीचांकी पातळीवर पडला असून सध्या स्टॉक या स्तरावरून शेअर दुपटीने वाढून रु. १०३१.४५ वर पोहोचला आहे.

शेअर बाजारात मोठे चढउतार, आता मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
अदानी ट्रान्समिशन
४,२३६.७५ रुपये प्रति शेअर या ५२ आठवड्यांच्या उच्चांकावरून अदानी ट्रान्समिशन का शेअर हिंडेनबर्गच्या अहवालामुळे ६३१.५० रुपयांच्या पातळीवर गेल्यानंतर आता ११३८.६० रुपयांवर व्यवहार करत आहे. २४ जानेवारीला स्टॉक २७३८ रुपयांवर बंद झाला होता आणि दुसऱ्या दिवशी २५३९ रुपयांपर्यंत घसरला. तर २७ जानेवारी रोजी शेअर आणखी घसरून २,०१४.२० रुपयांवर बंद झाला.

अदानी पॉवर
हिंडेनबर्गच्या अहवालाने अदानी पॉवरला बेदम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. शेअर आपल्या ४३२.५० रुपयांच्या ५२ आठवड्यांचा उच्चांकावरून घसरत असताना हिंडेनबर्गने जोरदार धक्का दिला आणि स्टॉकचा भाव अर्ध्याहुनही कमी झाला. सध्या स्टॉकची किंमत १९७.३५ रुपयांवर पोहोचला असून नुकसान भरून काढण्यासाठी त्याला आणखी कालावधी लागेल.

टाटांच्या शेअरची जोरदार बॅटिंग! गुंतवणूकदारांना लॉटरी, कोणता आहे हा शेअर जाणून घ्या
अदानी विल्मर
एकीकडे बाजार तज्ञांना अदानी विल्मरचा स्टॉक १००० रुपयाच्या वर जाण्याची अपेक्षा करत होते तर दुसरीकडे स्टॉक ५२ आठवड्यांच्या ८७८ रुपयांच्या उच्चांकावरून ३२७.२५ रुपयांपर्यंत घसरला. हिंडेनबर्गच्या अहवालाचा परिणाम म्हणजे समूहातील इतर शेअर्सप्रमाणे अदानी विल्मरला देखील मोठं नुकसान सोसावं लागलं. अहवालाच्या दिवशी म्हणजे २४ जानेवरीला शेअर ५७३.१५ रुपयांवर बंद क्लोज झाला होता तर आता तो ४१५.२५ रुपयांच्या जवळ ट्रेड करत आहे.

अदानी टोटल गॅस
हिंडेनबर्गच्या अहवालामुळे अदानी गॅस देखील फुस्स झाला. २३ जानेवारी २०२३ रोजी ४,००० प्रति शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठल्यानंतर या स्टॉकने आपली वाटचाल बदलली आणि १ मार्चपर्यंत तो ६५० रुपयांपर्यंत कोसळला असून सध्या रु. १००४.६५ वर व्यवहार करत होता.

एसीसी
अदानी समूहाने विकत घेतलेल्या सिमेंट कंपनीचा भक्कम पायाही हिंडेनबर्ग वादळामुळे डळमळीत झाला. २७ सप्टेंबर २०२२ रोजी स्टॉकने ५२ आठवड्यांचा सर्वकालीन उच्चांक गाठला आणि २७ फेब्रुवारी २०२३ रोजी १६५९ रुपयांच्या नीचांकी पातळीवर आपटला. तर २४ जानेवारी रोजी २,३३५ रुपयांवर बंद झालेला स्टॉक २७ जानेवारीपर्यंत १८९९.९० रुपयांपर्यंत घसरला. सध्या स्टॉक १७२४.३५ वर व्यवहार करत आहे.

NDTV
अदानींच्या झोळीत पडताच रॉकेट बनलेल्या एनडीटीव्हीचे शेअर्स हिंडनबर्गच्या अहवालानंतर धाराशायी झाले. ५७३ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकावरून आज हा शेअर १९५.६५ रुपयांवर व्यवहार करत आहे. तर २४ जानेवारी २०२३ रोजी स्टॉक रु. २८४.०५ वर क्लोज झाला होता.

अंबुजा सिमेंट
अंबुजा सिमेंट २८ मार्च २०२२ रोजी तयार करण्यात आलेल्या २८८.५० रुपयाच्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर व्यवहार करत होता. तर आज शेअर ३७१.३० रुपयांवर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here