राहुल गांधी यांच्या परदेशातील एका वक्तव्याविरोधात भाजपचे खासदार गेल्या आठवडभरापासूनच संसदेत आक्रमक झाले होते. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेतील कामकाज अनेकदा तहकूब झाले होते. अशातच सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवून दोन वर्षांच्या तुरुंगावासाची शिक्षा सुनावली होती. मात्र, उच्च न्यायालायत अपील करण्यासाठी राहुल गांधी यांना ३० दिवसांची मुदत देण्यात आली होती. त्यासाठी राहुल गांधी यांना जामीन मंजूर करण्यात आला होता.
राहुल गांधी हे केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. २०१९ साली राहुल गांधी यांनी अमेठी आणि वायनाड अशा दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. यापैकी अमेठीमध्ये राहुल गांधी यांचा भाजपच्या स्मृती इराणींना पराभव केला होता. मात्र, वायनाड मतदारसंघातून राहुल गांधी निवडून आले होते.
राहुल गांधी नेमकं काय म्हणाले होते?
राहुल गांधी यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी भाजपवर टीका करताना मोदी या आडनावावरुन टिप्पणी केली होती. सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? मग ते ललित मोदी असो वा नीरव मोदी वा नरेंद्र मोदी, असेही त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधींच्या विरोधात सुरत न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. या खटल्यात निकाल देताना सुरत जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी राहुल गांधी यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती.