विरारः रेल्वे स्थानकात एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी पुलाचा वापर करा, रेल्वे रूळ ओलांडू नका अशा सूचना रेल्वे स्थानकावर प्रवाशांना वारंवार देण्यात येतात, मात्र त्याचे गांभीर्य लक्षात न घेता प्रवासी दुर्लक्ष करत असल्याचे पहावयास मिळते. रेल्वे रूळ ओलांडताना झालेल्या अपघातांमध्ये प्रवाशांना आपला जीव गमवावा लागतो. असाच एक धक्कादायक प्रकार विरार रेल्वे स्थानकात येथे समोर आला आहे.विरार रेल्वे स्थानकात भरधाव रेल्वे ट्रेनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रेल्वे स्थानकातील रेल्वे रूळ ओलांडताना हा अपघात घडला असून मृतकांमध्ये तीन वर्षाच्या चिमुकल्या बाळाचा देखील समावेश आहे. या संपूर्ण घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शिक्षकाच्या बायकोला साडीचा मोह महागात पडला, ५ रुपयांसाठी गमावले ९९ हजार, काय घडलं?
पश्चिम रेल्वेच्या विरार रेल्वे स्थानकात एका दाम्पत्याने रेल्वे ब्रिजवरून न जाता रेल्वे रूळ ओलांडण्याचा मार्ग अवलंबला रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक चार व पाच मधील रूळ ओलांडताना भरधाव येणाऱ्या मेल एक्सप्रेस ट्रेनने जोरदार धडक दिली. या अपघातात पती-पत्नी व तीन वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला आहे. रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास हा अपघात घडला आहे. या अपघातात २८ वर्षीय पुरुष, २६ वर्षीय महिला आणि तीन महिन्यांचा मुलगा अशा तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

पाळीव पोपटाने मिळवून दिला मालकीणीला न्याय, पोलिसांना दिला पुरावा, असा झाला हत्येचा उलगडा
रेल्वे अपघातात मृत पुरुष आणि महिला हे मूळ बिहार राज्यातील राहणारे असून ते मजुरीचे काम करत असल्याचे कळते. मृतकांची ओळख अद्याप पटलेली नसून याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

‘हाफ’तिकीटाचे आदेश; स्वारगेट बस डेपोत एकमेकांना पेढे भरवत महिलांनी आनंद साजरा केला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here