घटनेची माहिती मिळाल्यानंतर फैजपुर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरूडे, यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक हे घटनास्थळी दाखल झाले आहे.
भिमराव सोनवणे यांच्यावर सुरुवातीला मारेकऱ्यांनी गळ्यावर वार केले, त्यानंतर त्यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचे घटनास्थळावरील परिस्थितीवरुन समोर आले आहे. मृतदेहाचा पंचानामा करण्यात आला आहे, तसेच घटनास्थळी श्वानपथकाला पाचारही करण्यात आले होते. शेवटचे वृत्त हाती तोपर्यंत मयत भिमराव सोनवणे यांचा मुलगा विनोद भिमराव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
गावापासून काही अंतरावर भिमराव सोनवणे हे कसे आले, रात्रभर भिमराव सोनवणे यांच्यासोबत काय घडले, त्यांचा एवढ्या निर्घृणपणे खून कोणी व कोणत्या कारणासाठी केला, यासह अनेक प्रश्न उपस्थित होत असून या सर्व प्रश्नांच्या आधारावर पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे.
ऑन ड्युटी पोलिसाचा मृत्यू; आई, पत्नीसह लहान लेकराची फरफट; जुनी पेन्शन योजनेमुळे कुटुंबाला मदतीची अपेक्षा
दरम्यान रविवारी पहाटे पाचोरा तालुक्यातील वाळू व्यावसायिक तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता, या घटनेला दोन दिवस उलटत नाहीत, तोच बुधवारी जामनेर तालुक्यातील पहूर गावाजवळ एका शेतात दगडाने ठेचून तरुणाचा खून करण्यात आला होता. पाच दिवसातील तीन खुनाच्या घटनांमुळे पोलिसांचा धाक संपला आहे की काय असा सवाल उपस्थित होत आहे तर दुसरीकडे दोन्ही घटना ताज्या असतानाच पुन्हा वाहनचालक वृद्धाचा निर्घृण पद्धतीने खून करण्यात आल्याच्या या घटनेने जळगाव जिल्हा हादरला आहे.