नाशिक : नाशिक शहर पुन्हा एकदा हत्येच्या घटनेनं हादरलं आहे. शहरातील पाथर्डी फाटा परिसरात असलेल्या पांडव लेणी येथे हत्येची घटना घडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रात्रीच्या सुमारास काही अज्ञात संशयितांनी एका कंपनी मॅनेजरवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करत त्यांचा मृतदेह रस्त्यावर फेकून दिल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मुंबई नाशिक महामार्गावर असलेल्या पाथर्डी फाट्याजवळील पांडव लेणीच्या पायथ्याशी असलेल्या हॉटेल आंगणजवळ रात्री नऊ वाजेच्या सुमारास रोहिणी इंडस्ट्रीजचे मॅनेजर असलेले योगेश मोगरे हे आपले काम उरकून घरी निघाले होते. गरवारे येथील सर्विस रोडवरून पाथर्डी फाट्याकडे चारचाकी कारने जात असताना अज्ञात दोन संशयितांनी त्यांची गाडी अडवून त्यांना थांबवलं. यावेळी संशयितानी लपवलेले धारदार कोयते, हत्यारे काढून मोगरे यांच्या अंगावर, पाठीवर तसेच मानेवर सपासप वार करत त्यांना गंभीर जखमी केले.

चोराला चोर म्हणणं आपल्या देशात गुन्हा ठरला; राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यावर उद्धव ठाकरेंनी भाजपला डिवचलं
दरम्यान, या हल्ल्यात योगेश मोगरे हे गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यानंतर रस्त्यावरून जात असलेल्या एका रिक्षा चालकाने मोगरे यांना आपल्या रिक्षात बसवून जवळच्या एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, आज सकाळी उपचारादरम्यान योगेश यांचा मृत्यू झाला. मोगरे यांच्यावर हल्ला केल्यानंतर हल्लेखोरांनी मॅनेजरची चारचाकी कार पळवून नेली. ही पळवून नेलेली कार नाशिक मुंबई महामार्गावर असलेल्या वाडीवऱ्हे शिवारात सापडली आहे. तर तिथून संशयित आरोपी फरार झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

कंपनी मॅनेजर असलेल्या योगेश मोगरे यांच्यावर हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला आमि त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र, त्यांच्यावर हा प्राणघातक हल्ला का करण्यात आला होता? याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. घटनेनंतर घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांचा मोठा फौज फाटा दाखल झाला होता. पोलिसांनी घटनास्थळावर पाहणी करून हल्लेखोरांचा शोध घेण्याच्या सूचना केल्या असून शोध सुरू केला आहे. या प्रकरणी रात्री उशिरा इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोठी बातमी : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द, मानहानी प्रकरणी शिक्षेनंतर लोकसभा अध्यक्षांची कारवाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here