वाशिम : जावयाने घरगुती वादातून भयंकर पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे. आधी त्याने आपल्या सासूबाईंची हत्या केली, त्यानंतर पत्नीवर प्राणघातक हल्ला केला, अखेर स्वतःही विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. वाशिम शहरात हा अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार घडला आहे.वाशिम शहरातील बिलाल नगर परिसरात राहणाऱ्या एका जावायाने घरगुती वादातून आपल्या सासूची निर्घृण हत्या केली. ही घटना काल (गुरुवारी) दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली आहे. यामध्ये आरोपीने आपल्या पत्नीवरही प्राणघातक हल्ला करत तिला गंभीर जखमी केले. अखेर स्वतःही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. अब्दुल हाफीज अब्दुल सलाम (रा. बिलाल नगर, वाशिम) असं या आरोपी जावयाचं नाव आहे. या घटनेमुळे वाशिम जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

मला चांगल्या पगाराची नोकरी, पण मन लागत नाही; पिंपरीत २७ वर्षीय अभियंत्याने आयुष्य संपवलं
वाशिम शहरातील बिलाल नगर परिसरात राहणाऱ्या आरोपी अब्दुल हाफिज अब्दुल सलाम याचा आपल्या पत्नीसोबत अनेक वर्षांपासून वाद सुरु होता. दरम्यान काल २३ मार्च रोजी वाद इतका विकोपाला गेला की आरोपीने आपली सासू रुबीना बी यांच्या डोक्यावर फावडा मारला. त्यामध्ये त्या जागीच ठार झाल्या. तर पत्नी सबा परवीन हिच्यावर सुद्धा आरोपी पतीने जोरदार हल्ला चढवला. यामध्ये सबाही गंभीर जखमी झाली. तिला नातेवाईकांनी वाशिमच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. मात्र सबाची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला औरंगाबाद येथे पुढील उपचाराकरिता हलवण्यात आले असून त्यांच्यावर औरंगाबाद येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

पप्पांनी पंखे पुसताना सूसू केली, चिमुकल्याने दादाला सांगितलं; नंतर समजलं बँक मॅनेजरने गळफास घेतला
आरोपी अब्दुल हाफीजने आपल्या सासूची हत्या केली आणि पत्नी सबाला गंभीर जखमी केल्यानंतर रागाच्या भरात स्वतःही विष प्राशन केले असून त्याच्यावर सुद्धा वाशिम येथे उपचार सुरू असल्याची माहिती आहे. या प्रकरणी मृत महिलेचा मुलगा शेख समीर शेख चांद यांच्या फिर्यादीवरून आरोपी अब्दुल हाफिज अब्दुल चांद याच्यावर वाशिम शहर पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास वाशिम पोलीस करत आहेत. आज रमजानचा पवित्र महिना सुरू होण्याआधीच मुस्लिम बहुल असलेल्या बिलाल नगरात खुनाची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

लॉंग मार्चमध्ये शेतकऱ्याचा अखेरचा श्वास; कुटुंबियांचे अश्रू अनावर, गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here