मुंबई : ब्लॉक इंकवरील शॉर्ट सेलर कंपनी हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर जॅक डोर्सीच्या निव्वळ संपत्तीला मोठा फटका बसला आहे. हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालात पेमेंट्स कंपनीने त्यांच्या कामकाजात मोठ्या प्रमाणावर फसवणूक करण्याकडे दुर्लक्ष केले, असा दावा करण्यात आला आहे. गुरुवारी संध्याकाळी अहवाल आला आणि डोर्सीच्या संपत्तीत $५२६.६ दशलक्ष (सुमारे ४२ अब्ज कोटी रुपये) घट झाली.ट्विटरचे माजी सह-संस्थापक जॅक डोर्सी यांनी २००६ मध्ये मायक्रो-ब्लॉगिंग साइटची स्थापना केली होती. यासोबतच त्याने ईव्ही विल्यम, विज स्टोन आणि नोआ ग्लॉस या आणखी अनेक कंपन्या सुरू केल्या असून २००८ पर्यंत त्यांच्या सीईओ पदावर विराजमान होते.

Adani Stocks Update: हिंडेनबर्ग अहवालाचे पडसाद, अदानींचे शेअर्स सपाटून आपटले; अशी आहे सद्यस्थिती
जॅक डोर्सीची निव्वळ संपत्ती
ट्विटरचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी गुरुवारी शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चचे नवीन लक्ष्य बनले. हिंडेनबर्गच्या दणक्यामुळे डोर्सीच्या एकूण संपत्तीमध्ये मोठी घसरण झाली ज्यात गुरुवारी लाखोने पडझड नोंदवली गेली. फोर्ब्स रिअल टाईम बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, ब्लॉक इंकचे सह-संस्थापक डोर्सीच्या निव्वळ संपत्तीत $७६१ दशलक्ष किंवा १५ टक्क्यांहून अधिक घट झाली असून यानंतर डोर्सी $४.२ अब्जच्या नवीन संपत्तीसह ६५४व्या क्रमांकावर फेकले गेले आहेत.

२०१४ ला अदानी ६०९ क्रमांकावर होते, मग जादू झाली, दुसऱ्या क्रमांकावर कसे पोहोचले? : राहुल गांधी

दुसरीकडे, ब्लूमबर्ग बिलियनियर्स इंडेक्सनुसार अहवालानंतर जॅक डोर्सीच्या संपत्तीत ५२.६ कोटी रुपयांची घट झाली आणि आता त्यांची एकूण संपत्ती $४.४ अब्ज इतकी शिल्लक राहिली असून श्रीमंतांच्या यादीतून टॉप ५०० च्या बाहेर फेकले गेले आहेत.

हिंडेनबर्गचे ब्लॉक इंकवर आरोप काय?

अमेरिकन शॉर्ट सेलर कंपनीने भारतीय अब्जाधीश गौतम अदानी यांच्यानंतर आपलं नवीन लक्ष्य यूएस-स्थित पेमेंट कंपनीला केले आहे. आपल्या अहवालात गुंतवणूकदारांची फसवणूक, दिशाभूल असे अनेक गंभीर आरोप हिंडेनबर्गने केले. विशेष म्हणजे हिंडेनबर्गने यापूर्वी गौतम अदानी यांच्या अदानी ग्रुपबाबत अहवाल सादर करत अनेक गंभीर आरोप केले होते. यानंतर गौतम अदानी यांच्या संपत्तीत कमालीची घट झाली आणि श्रीमंतांच्या पहिला ३० अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर पडले.

कोण आहेत जॅक डोर्सी? हिंडेनबर्गच्या जाळण्यात नवीन ‘मासा’, एका अहवालाने ८० हजार कोटी बुडाले
हिंडेनबर्गने डॉर्सीवर १ अब्ज डॉलरच्या फसवणुकीचा आरोप केला आणि त्याने व त्याचे सह-संस्थापक मॅककेल्वे यांनी करोना काळात एकत्रित $१ अब्ज पेक्षा जास्त स्टॉक विकले, असा दावा केला. उल्लेखनीय म्हणजे एप्रिल २०२० मध्ये डोर्सीने त्याच्या स्क्वेअर स्टॉकच्या भेटवस्तूंद्वारे $१ अब्ज – नंतर त्याच्या एकूण संपत्तीच्या २८% – कोविड-१९ मदत आणि इतर कारणांसाठी देण्याचे वचन दिले.

कोण आहेत जॅक डोर्सी?

डोर्सी २०१५ ते नोव्हेंबर २०२१ पर्यंत ट्विटरचे सीईओ म्हणून पदभार सांभाळला होता. त्यांनतर ते मे २०२२ मध्ये बोर्डातून पायउतार झाले. सध्या, जॅक डोर्सी हे ब्लॉक इंकचे सीईओ आहेत, ज्यावर हिंडेनबर्गने अहवाल सादर केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here