नवी दिल्ली : जुनी पेन्शन योजना लागू करू इच्छिणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकार नव्या पेन्शन योजनेचा (एनपीएस) आढावा घेणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत वित्त विधेयक मांडताना ही माहिती दिली. वित्त सचिवांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात येईल, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले. ही समिती नव्या पेन्शन योजनेचा आढावा घेणार आहे. प्रचंड घोषणाबाजी आणि गदारोळात अर्थमंत्र्यांनी शुक्रवारी वित्त विधेयक लोकसभेत मांडले. गदारोळात वित्त विधेयक २०२३ वर मतदान करण्यात आले असून वित्त विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे.

नवीन पेन्शन योजना कधी लागू
सरकारी कर्मचाऱ्यांना २००४ पूर्वी जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत निवृत्तीनंतर निश्चित पेन्शन मिळत असे. ही पेन्शन कर्मचाऱ्याच्या निवृत्तीच्या वेळेच्या पगारावर आधारित होती. या योजनेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांना पेन्शन मिळण्याचा नियम होता. परंतु अटलबिहारी वाजपेयी सरकारने एप्रिल २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना बंद केली. त्याच्या जागी नवीन पेन्शन योजना लागू झाली. नंतर राज्यांनीही नवीन पेन्शन योजना लागू केली.

जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा नेमका काय? Old Pension लागू करण्याच्या मागणीचे कारण काय
नवीन पेन्शन योजनेची वैशिष्ट्ये

१. एनपीएसमध्ये कर्मचार्‍यांच्या मूळ पगाराच्या १० टक्के + DA कापला जातो.

फक्त मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून संप मागे घेतला; सरकारी कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया

२. एनपीएसशेअर बाजारावर आधारित आहे. त्यामुळे ती अधिक सुरक्षित नाही.

३. एनपीएसमध्ये निवृत्तीनंतर पेन्शन मिळविण्यासाठी एनपीएस फंडातील ४०% गुंतवणूक करावी लागते.

४. या योजनेत निवृत्तीनंतर निश्चित पेन्शनची कोणतीही हमी नाही.

५. नवीन पेन्शन योजना शेअर बाजारावर आधारित आहे. त्यामुळे येथेही कराची तरतूद आहे.

६. नवीन पेन्शन योजनेत सहा महिन्यांनंतर मिळणार्‍या महागाई भत्त्याची (डीए) कोणतीही तरतूद नाही.

अधिक पेन्शनसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, जाणून घ्या EPFO चा नवीन आदेश
जुन्या पेन्शन योजनेची वैशिष्ट्ये

१. जुन्या पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या निम्मा पगार निवृत्तीच्या वेळी पेन्शन म्हणून दिला जातो.

२. या योजनेत सामान्य भविष्य निर्वाह निधी म्हणजेच GPF ची तरतूद आहे.

३. २० लाख रुपयांपर्यंतची ग्रॅच्युइटी रक्कम उपलब्ध आहे.

४. जुन्या पेन्शन योजनेतील पेमेंट सरकारच्या तिजोरीतून केले जाते.

५. निवृत्त कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांना पेन्शनची रक्कम मिळण्याचीही तरतूद आहे.

६. पेन्शनसाठी कर्मचाऱ्याच्या पगारातून एकही पैसा कापला जात नाही.

७. सहा महिन्यांनंतर DA मिळण्याची तरतूद आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here