देवरुख/रत्नागिरी : कोकणात दोन दुचाकी समोरासमोर धडकून झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात देवरुख पांगरी रोडवर अपघातात ४० वर्षीय संदेश सुभाष कदम याला प्राण गमवावे लागले. गुढीपाडव्यानंतर हा दुर्दैवी अपघात झाला आहे. देवरुख पांगरी रोड वर पूर फाट्याच्या पुढील वळणाजवळ ही घटना घडली. समोरून येणाऱ्या दुचाकीशी संदेशच्या बाईकची समोरासमोर भीषण धडक झाली.संदेशच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली आहे. संदेशच्या पश्चात आई व भाऊ असं कुटुंब आहे. त्याच्या पत्नीचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. संदेश सुभाष कदम हा किरकोळ कामधंदे करून आपला उदरनिर्वाह चालवत होता. संदेशच्या जाण्याने कुटुंबाचा मोठा आधार गेला आहे.

नेमकं काय घडलं?

संदेश सुभाष कदम (वय ४० वर्ष, रा. माळवाशी कडुवाडी ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी) हा त्याच्या ताब्यातील हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटार सायकल (क्रमांक एम.एच.०८ बी.ए.५०२८) घेऊन देवरुख जवळ असलेल्या वाशी येथे गावी निघाला होता. पाठीमागे नरेंद्र गुणाजी पेंढारी (वय ५० वर्ष, रा. माळवाशी) बसले होते. पूर फाट्याच्या पुढील वळणावर दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास सुभाष कदम याच्या ताब्यातील मोटार सायकलवरील ताबा सुटला. त्यानंतर राँग साईडला जाऊन समोरुन येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक झाली.

ज्या मित्राच्या घरी जेवला, त्याचाच जीव घेतला, मजामस्तीत एक गोष्ट ठरली दोस्तीत कुस्तीचं कारण
यावेळी पांगरी दिशेकडुन देवरुख दिशेकडे येणारी मोटार सायकल क्रमांक एम.एच. १० बी. एच. ३५८१ या या दुचाकीला जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये संदेश कदम याचा जागीच मृत्यू झाला तर संदेशच्या मागे बसलेले नरेंद्र गुणाजी पेंडारी किरकोळ दुखापत होऊन जखमी झाले. तर समोरुन येणाऱ्या बाईकवरील दोघे प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. युवराज कल्लाप्पा खोत (वय-३२ वर्ष, रा. विटा कर्वे सांगली रोड, ता. विटा. जि. सांगली) तसेच अविनाश पांडुरंग जाधव (वय ३५ वर्ष, रा. मंगरुळ आळते रोड ता. विटा. जि. सांगली) हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.

महिला-पुरुषांसाठी एकच बाथरुम; भाड्याच्या घरात असलेलं पोलीस ठाणे अडचणीत, कर्मचारी हतबल

या सगळ्या अपघात प्रकरणाची नोंद देवरूख पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. देवरूख पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक विद्या पाटील या अपघात प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

पप्पांनी पंखे पुसताना सूसू केली, चिमुकल्याने दादाला सांगितलं; नंतर समजलं बँक मॅनेजरने गळफास घेतला

Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here