नवी दिल्ली : भारत जोडो यात्रेनंतर चर्चेत आलेले काँग्रेसचे नेते आणि वायनाड लोकसभा मतदार संघाचे खासदार राहुल गांधी यांचे लोकसभेचे सदस्यत्व (खासदारकी) रद्द केल्यानंतर काँग्रेससह विरोधी पक्षांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. देशात ठिकठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही याचा निषेध केला आहे. या मुद्द्यावरून राहुल गांधी यांच्या भगिनी आणि काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांनीही ट्विट करत याचा निषेध केला आहे. प्रियांका गांधी यांनी ट्विटवर ट्विट करत या मुद्द्यावर केंद्रातील मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘ पंतप्रधान नरेंद्र मोदी, आपल्या चमच्यांनी एका शदीह पंतप्रधानांच्या पुत्रासा देशद्रोही, मीर जाफर म्हटले आहे. आपल्याच एका मुख्यमंत्र्यांनी प्रश्न विचारला की, राहुल गांधी यांचे वडील कोण आहेत?

मोठी बातमी : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द, मानहानी प्रकरणी शिक्षेनंतर लोकसभा अध्यक्षांची कारवाई
प्रियांका गांधी पुढे म्हणतात,’काश्मिरी पंडितांच्या परंपरेचे पालन करताना एक पुत्र आपल्या पित्याच्या मृत्यूनंतर पगडी घालते, आपल्या कुटुंबाची परंपरा कायम राखतो. ही परंपरा आपण संपवायला निघाला आहात. याच कुटुंबाने भारतातील जनतेचा आवाज बुलंद केला आणि पिढ्यानपिढ्या सत्याची लढाई लढली. आमच्या नसानसांमध्ये जे रक्त वाहते आहे त्याचे एक वैशिष्ठ्य आहे…. आपल्यासारख्या डरपोर, सत्तालोभी हुकुमशहाच्या समोर कधीही झुकला नाही आणि कधी झुकणारही नाही. आपण काहीही करा.
आणखी एका ट्विटमध्ये प्रियांका गांधी पुढे म्हणतात, ‘ नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्यावर प्रश्न विचारले… आपला मित्र गौतम अदानी देशाची संसद आणि भारतातील महान जनतेपेक्षा इतका मोठा झाला आहे का की आपण इतके घाबरलात?

सातारा हादरले! इयत्ता आठवीत शिकणाऱ्या दोन मुलांनी संपवले जीवन, पालकांना बसला मोठा धक्का
आपण माझ्या कुटुंबाला परिवारवादी म्हणता, पण हे लक्षात घ्या, याच कुटुबाने भारताच्या लोकशाहीला आपल्या रक्ताचे शिंपण घातले आहे.भरलेल्या संसदेत आपण संपूर्ण कुटुंबाचा आणि काश्मिरी पंडितांचा अपमान करत विचारले की, ते नेहरू हे आडनाव का नाही ठेवत… परंतु आपल्याला कोण्या न्यायाधीशाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली नाही. आपल्याला संसदेतून अपात्र नाही केले, असे प्रियांका यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी एका सच्चा देशभक्ताप्रमाणे अदानीच्या लुटीवर प्रश्न उपस्थित केले, असेही प्रियांका गांधी वाड्रा यांनी शेवटी म्हटले आहे.
कोण आहे ही मुलगी? अमृता खानविलकरने शेयर केला नृत्याचा व्हिडिओ; कोल्हापूरच्या चिमुकलीने मन जिंकलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here