राहुल गांधी यांनी मी भारताच्या आवाजासाठी लढत असून त्यासाठी जी किंमत चुकवावी लागेल ती चुकवण्यास तयार असल्याचं म्हटलं. राहुल गांधी लोकसभा सचिवालयानं खासदारकी रद्द केल्यानंतर संसदेत दाखल झाले होते.
राहुल गांधी यांचं ट्विट
राहुल गांधी यांच्यावरील कारवाईनंतर काँग्रेस आक्रमक
राहुल गांधी यांची खासदारकी गेल्यानंतर काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस नेत्यांची देशपातळीवरील बैठक ऑनलाइन पद्धतीनं सुरु असल्याची माहिती आहे. दुसरीकडे काँग्रेस खासदारांनी ससंदेत ते राष्ट्रपती निवासस्थान असा मार्च काढला होता. राहुल गांधी यांच्यावरील कारवाईचा निषेध करत असल्याचं पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी म्हटलं.
लोकशाहीच्या संरक्षणासाठी आमची लोकं तुरुंगात गेली आहेत. आम्ही देखील गरज पडल्यास लोकशाहीच्या संरक्षणासाठी तुरुंगात जाण्यास तयार असल्याचं मल्लिकार्जून खर्गे म्हणाले. राहुल गांधी यांच्यावरील कारवाईनंतर महाराष्ट्रात देखील मुंबई, पुणे आणि विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत.
ही कारवाई द्वेषभावनेतून : प्रकाश आंबेडकर
सूरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. तसेच उच्च न्यायालयात अपील करण्याची मुभा दिलेली आहे. राहुल गांधी यांनी जाहीर केलेले आहे ते अपील करणार आहेत. असं असताना भाजपच्या सरकारने तातडीने त्यांची खासदारकी रद्द करणे चुकीचे आहे, असं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. आम्ही त्याचा निषेध करतो. सरकारने किमान उच्च न्यायालयाय ती ऑर्डर रद्द करते का याची वाट बघायला पाहिजे होती. उच्च न्यायालयाने ऑर्डर रद्द नसती केली तर सरकारने आपला अधिकार वापरला असता तर योग्य झाले असते. मात्र आता केवळ द्वेष भावना असल्याचे याठिकाणी दिसत आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.