परभणी : सुरक्षा रक्षक असलेल्या एका ४० वर्षीय विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर सतत चार वर्ष अत्याचार करण्यात आला असल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. “अत्याचार केल्याची माहिती पोलीस स्टेशनला दिली तर रॉकेल टाकून तुला जाळून टाकेल”, अशी धमकीच आरोपीने पीडितेला दिली होती.

ही घटना परभणी शहरातील कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडली आहे. या प्रकरणी महिलेनं दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक शर्मा असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे.

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द होताच अजित पवारांनी इतिहास काढला, ४३ वर्षापूर्वीचा प्रसंग सांगत म्हणाले…
परभणी शहरातील कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहणारी ४० वर्षीय सुरक्षा रक्षक महिला हिला आरोपी अशोक शर्मा याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. सदरील प्रकार हा चार वर्ष सुरु असल्याने महिलेनं आरोपीला लग्नाविषयी विचारले असता आरोपीने महिलेला जातीवाचक शिवीगाळ करत लग्न करण्यास नकार दिला. संबधित आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने पीडित महिलेला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून “तुला काय करायचे ते कर”, अशी धमकी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही विवाहित असून तिचा पती तिला सोडून गेला होता. म्हणून अशोक शर्मा आणि तिच्यात प्रेमसंबध होते.

“अत्याचाराची केल्याची माहिती सांगण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलीस तर रॉकेल टाकून जाळून टाकील”, अशी धमकी देखील दिली. यामुळे घाबरलेल्या पीडित महिलेनं अखेर कोतवाली पोलीस ठाणे गाठून दिलेल्या तक्रारीवरून अशोक शर्मा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गावडे हे करत आहेत. दरम्यान, या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पत्नी-मुलांना सासुरवाडीला सोडलं, सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू, नाशकात हळहळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here