वॉशिंग्टन: मृत्यू हा माणसाच्या आयुष्याचा शेवट असतो. त्यानंतर काहीही उरत नाही, असं मानतात. पण. अमेरिकेतून एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. येथे हृदयविकाराच्या धक्क्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. डॉक्टरांनीही त्याला तपासून मृत घोषित केले पण, काहीच वेळात ती व्यक्ती पुन्हा जिवंत झाली. इतकंच नाही तर मृत्यूनंतर त्याच्यासोबत काय झालं हे देखील त्याने सांगितलं. हे सारं पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, ५५ वर्षीय केविन हिल यांना मिरॅकल मॅन म्हणून संबोधले जात आहे. २०२१ च्या उन्हाळ्यात केविनच्या शरीरात पाण्याचं प्रमाण जास्त झाल्याने त्याचे पाय सुजले होते. डॉक्टरांनी सांगितलं की त्यांच्या शरीरात तीन ऐवजी दोन व्हॉल्व्ह आहेत आणि त्यातही समस्या आहेत. यावर उपचार म्हणून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पण, त्यांचा त्रास कमी होण्याऐवजी वाढतच गेला.

समुद्रातून भयानक प्राणी बाहेर येतील, माणसांवर हल्ला करतील, शास्त्रज्ञांचा धडकी भरवणारा रिसर्च
त्यांची त्वचा आणि रक्तवाहिन्यांमध्ये कॅल्शिअम साठू लागलं. त्यामुळे त्यांना वेदना होऊ लागल्या. एक दिवस त्यांच्या पायातून रक्त यायला लागलं आणि अवघ्या काही तासात त्यांच्या शरीरातून तब्बल दोन लिटरहून अधिक रक्त वाहून गेलं. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण, अखेर त्यांना क्लिनिकली मृत घोषित करण्यात आलं. पण, काहीच क्षणात चमत्कार घडला आणि ते अचानक जिवंत झाले. जेव्हा ते अचानक जिवंत झाले, त्यांच्या शरीराची हालचाल झाली, ते पाहून डॉक्टरांचा विश्वासच बसेना. डॉक्टरांनी केविनला “द मिरॅकल मॅन” असे संबोधले आहे.

लॉंग मार्चमध्ये शेतकऱ्याचा अखेरचा श्वास; कुटुंबियांचे अश्रू अनावर, गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त

केविनची तब्येत आता पूर्णपणे बरी आहे. पण, त्याच्या मृत्यूनंतर त्याच्यासोबत घडलेल्या सर्व गोष्टी त्याला आजही आठवतात. त्याने त्याच्या मृत्यूनंतर अनुभवलेला प्रत्येक क्षण सांगितला. त्यांनी साऊथ वेस्ट न्यूज सर्व्हिसला सांगितले की, मृत्यूनंतर मी आत्म्यासोबत गेलो होतो. माझा आत्मा शरीरात नव्हता. मला माझं शरीर दिसत नव्हते. जणू काही माझा आत्मा हा कुणाच्या तरी दुसऱ्याच्या नियंत्रणात होता. पण, जे काही घडत होतं, ते मी पाहू शकत होतो. तिथे खूप शांतता होती. मग अचानक मला असं वाटलं की मी झोपलेलो आहे आणि माझ्या शरीरातून होणारा रक्तस्त्राव थांबला आहे. आता माझ्या मृत्यूची वेळ आलेली नाही, असं मला वाटत होते.

बेडरूममध्ये गेली, पलंगावरील चादर बदलणार तेवढ्यात तिला तो दिसला अन्…
जेव्हा त्याला विचारण्यात आले की त्याला कुठला पांढरा प्रकाश दिसला का, यावर केविन म्हणाला की, मला असा कोणताही प्रकाश दिसला नाही. मी स्वर्गात जाणार आहे असे कोणतेही चिन्ह मला दिसले नाही. मी झोपेतून उठलो तेव्हा डॉक्टर माझ्यासोबत होते. माझ्या हृदयाचे ठोके सुरु होते आणि मला खूप शांत वाटत होते. जवळपास वर्षभराच्या उपचारानंतर तो घरी परतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here