नागपूर : नागपूर शहरातील गुन्हेगारांच्या मनातून पोलिसांची भीती नाहीशी झाली आहे असे वाटावे अशा गुन्हेगारीच्या घटना घडताना दिसत आहेत. एकीकडे गुंडगिरी सुरू असताना आता गुन्हेगार थेट गोळीबार करताना दिसत आहेत. असाच एक प्रकार गुरुवारी रात्री उशिरा तहसील पोलीस ठाण्याच्या मोमीनपुरा परिसरात उघडकीस आला आहे. येथे आरोपींनी एका सर्वसामान्य व्यक्तीला मारण्यासाठी गोळीबार केला. मात्र, नेम चुकल्याने त्या व्यक्तीचे प्राण वाचले. या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रवी लांजेवार आणि आनंद ठाकूर अशी आरोपींची नावे असून त्यांचे दोन सहआरोपी प्रणय चांडक आणि सिमिर बुलबुले हे फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. नईम अख्तर हलीम असे हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पीडित नईम हलीम हा मोमीनपुरामध्ये परिसरात पानठेला चालक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाहनाच्या कट लागल्याचा कारणावरून झालेल्या वादात ही गोळी झाडल्याची माहिती समोर येत आहे.
भ्याड, सत्तालोभी हुकुमशहापुढे कधी झुकणार नाही; प्रियांका गांधी यांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रवी लांजेवार त्याच्या अन्य तीन साथीदारांसह गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमारास मोमीनपुरा परिसरातील चहाटपरी येथे चहा पिण्यासाठी आला होता. त्याचवेळी नईम पानठेल्यासमोर दुचाकी चालक शहाबुद्दीन रियाजुद्दीन उर्फ पापा नावाच्या व्यक्तीला हेक्सा कारने धडक दिली. त्यानंतर शहाबुद्दीनने कार चालकाला पकडून मारहाण केली. मात्र, गर्दी जमल्याने रवी लांजेवार यांनी साथीदारांसह घटनास्थळावरून निघून जाणेच योग्य मानले.

येथून हे चार आरोपी संग्राम बारमध्ये पोहोचले आणि तेथे ते दारू प्यायले. दारूच्या नशेत ते चारही आरोपी पुन्हा कारने मोमीनपुरा परिसरामध्ये पोहोचले. त्याचवेळी त्यांना पान टपरीच्या बाहेर पान टपरी चालक नईम दिसला.

सातारा हादरले! इयत्ता आठवीत शिकणाऱ्या दोन मुलांनी संपवले जीवन, पालकांना बसला मोठा धक्का
आरोपींनी त्याला शहाबुद्दीन समजले आणि त्यामुळे आनंद ठाकूर नावाच्या गुन्हेगाराने रिव्हॉल्व्हरमधून एकामागून एक दोन गोळ्या झाडल्या. मात्र मद्यधुंद अवस्थेत त्याचे लक्ष्य चुकले. त्यामुळे नईमचा जीव वाचला. ही घटना घडवून चारही आरोपी तेथून पळून गेले.

रात्री उशिरा गोळीबाराची घटना समजताच पोलीसदलात खळबळ पसरली. पोलिसांनी आरोपी रवी लांजेवार आणि आनंद ठाकूर यांना रात्री उशिरा ताब्यात घेतले असून प्रणय आणि समीर नावाच्या त्याच्या अन्य दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.
कोण आहे ही मुलगी? अमृता खानविलकरने शेयर केला नृत्याचा व्हिडिओ; कोल्हापूरच्या चिमुकलीने मन जिंकलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here