टोकियो: लग्नानंतर पती-पत्नी हे एकत्र एकाच घरात एकाच खोलीत राहतात. आजवर आपण हेच बघत आलो आहोत. कालपर्यंत जे वेगवेगळ्या ठिकाणी राहायचे ते आज एकत्र एका खोलीत राहतात. जर एखादं जोडपं लग्नानंतरही वेगवेगळं झोपत असेल तर त्यांच्यात वाद किंवा दुरावा असल्याचं समजलं जातं. पण, जपानमध्ये पती-पत्नी हे नेहमी वेगवेगळ्या खोलीत झोपतात. नक्कीच हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. जर तुम्हाला असे वाटत असेल की जपानमध्ये जोडप्यांचे एकमेकांवर प्रेम नाही म्हणून ते वेगवेगळे झोपतात, तर असं नाहीये. जपानी लोक एकमेकांच्या प्रेमात असूनही रात्री एकत्र झोपत नाहीत. याचा अर्थ असा नाही की त्यांच्यातील नातं कमकुवत आहे किंवा ते नातं संपवण्याचा विचार करत आहे. खरं सांगायचं तर, हे जोडपे त्यांचं नातं अधिक दृढ करण्यासाठी असे करतात.
बेडरूममध्ये गेली, पलंगावरील चादर बदलणार तेवढ्यात तिला तो दिसला अन्…
जपानमधील जोडपे एकमेकांच्या झोपेला खूप महत्त्व देतात. दोघांपैकी एकाला आधी उठावं लागलं तर तो दुसऱ्याची झोपमोड करेल. अशा परिस्थितीत दोघेही स्वतंत्रपणे झोपतात आणि पुरेशी झोप घेण्यासाठी एकमेकांना पूर्ण वेळ देतात. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगली झोप किती महत्त्वाची आहे हे त्यांना माहिती आहे, म्हणून वेगवेगळे झोपतात, असं सांगितलं जातं.

अमुक एका जाती धर्माचा म्हणून प्रेम करणार नाही, असं नसावं; प्रेम झाडासारखं असावं | नागराज मुंजळे

जपानमध्ये लहान मुलं हे त्यांच्या आईसोबत झोपतात. तिथे हे खूप महत्वाचे मानले जाते. त्यांच्यानुसार याने आईच्या अचानक मृत्यूचा धोका कमी होतो, त्याशिवाय मुलांच्या हृदयाचे ठोकेही नियंत्रणात असतात. तर पुरुष हा निर्णय घेऊ शकतात की त्यांनी पत्नी आणि मुलांसोबत झोपायचं आहे की वेगळे झोपायचं आहे. पण, या निर्णयामुळे दोघांची झोपमोड होऊ नये.

हार्ट अटॅकनं जीव गेला, पुन्हा जिवंत झाला; मृत्यूनंतर काय झालं सारं सांगितलं, डॉक्टरही हैराण
जपानमध्ये वेगळं झोपणे म्हणजे शांतता मानलं जातं. वेगळे झोपणाऱ्या जोडप्यांमध्ये प्रेम नसते असे जरी संपूर्ण जगाला वाटत असले तरी जपानमध्ये त्याला खूप महत्त्व दिलं जातं. आपल्या खोलीत राहून आपल्या जोडीदाराची झोपमोड होऊ नये, असे जपानी लोकांना वाटत नाही. या कारणास्तव ते स्वतंत्रपणे झोप घेतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here