नागपूर : लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केले आहे. या निर्णयानंतर काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, राहुल गांधींनी ओबीसी समाजाची माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस आणि माजी आमदार आशिष देशमुख यांनी केली आहे. शुक्रवारी या विषयावर आपले निवेदन प्रसिद्ध करताना देशमुख म्हणाले, “आगामी लोकसभेसह सर्वच निवडणुकांमध्ये होणारा फटका टाळण्यासाठी आणि ओबीसींची व्होटबँक भाजपकडे जाण्यापासून रोखण्यासाठी त्यांनी माफी मागितली पाहिजे.” यासोबतच हायकमांड आपल्या मागणीवर नाराज होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.आशिष देशमुख म्हणाले की, २०१९ मध्ये त्यांच्याकडून चुकून काही शब्द निघाले असतील, तर मोठा ओबीसी समाज संतप्त झालेला पाहून राहुलजींनी नक्कीच माफी मागावी. ही आमची मागणी असेल. समाजाला चोर म्हणणे नक्कीच योग्य नाही. याआधीही राहुल यांनी दोन वेगवेगळ्या मुद्द्यांवर माफी मागितली असून इथे ओबीसी समाजाचा मुद्दा आहे. राहुलजींनी माफी मागितली तर त्यांचा प्रतिमा अधिक उंचावेल ,आणि हा जो सगळा प्रकार सुरू आहे, तो काँग्रेसला शांत व्हायला मदत करेल.

…२०१९ मध्ये पक्षाला फटका बसला आहे

माफीनाम्याला विरोध करणाऱ्या नेत्यांना उत्तर देताना आशिष देशमुख म्हणाले, “हा भावनांचा प्रश्न आहे. इथे एका व्यक्तीचे दुःख होत नाही, संपूर्ण ओबीसी समाजाला दुःख होत आहे. राहुल गांधींनी मोठ्या मनाने माफी मागावी, ही आमच्यासारख्या नेत्यांची मागणी आहे. ते म्हणाले, “चौकीदार चोर है” च्या संदर्भातही आमच्या वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेस कार्यकारिणीत (सीडब्ल्यूसी) नाराजी व्यक्त केली होती. त्यातही त्यांना कोर्टात माफी मागावी लागली. पण तोपर्यंत काँग्रेसने २०१९ मध्ये किंमत चुकवली होती.

लोकसभेसह अनेक विधानसभा निवडणुका

देशमुख म्हणाले, “कर्नाटकमध्ये काही दिवसांत निवडणुका आहेत आणि त्यानंतर डिसेंबरमध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानमध्ये जेथे ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यानंतर २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत. या सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेसने ओबीसी समाजाला अंगीकारण्याची गरज आहे आणि अशा परिस्थितीत जर एखाद्या चुकीच्या शब्दामुळे ओबीसी समाज नाराज झाला असेल तर नक्कीच माफी मागून ओबीसी समाज समजून घेईल, आणि पुन्हा एकदा पूर्ण उत्साहाने सोबत राहील. ते पुढे म्हणाले, “राहुल हे मोठे मन आणि चांगले हेतू असलेले व्यक्ती आहे. त्यांनी खुल्या मनाने ओबीसी समाजाचा स्वीकार केला पाहिजे.

भारताच्या आवाजासाठी लढतोय, किंमत चुकवण्यास तयार, राहुल गांधींचं खासदारकी गेल्यानंतर पहिलं ट्विट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here